लव्ह जिहाद, लँड जिहाद वगैरे प्रकारानंतर आता आपल्या समाजात कॉर्पोरेट जिहाद ही एकप्रकारे आधुनिक संकल्पना हे जिहादी मानसिकतेचे मुस्लिम अमलात आणू पाहात आहेत. जाळीदार टोपी, दाढीतले मुल्ला मौलवी सक्तीने, फसवून धर्मांतरण करत असल्याच्या असंख्य घटना याआधीही घडलेल्या आहेत. पण आता कोट, टाय, सूटबूट अशा पेहरावातील धर्मांतरणाची नवी कोरी संकल्पना घेऊन जिहादी मानसिकता असलेले लोक आता मल्टिनॅशनल कंपन्या, उच्चविद्याविभूषितांमध्ये, चांगली आर्थिक कमाई करणाऱ्यांमध्ये वावरू लागले आहेत. नाशिकमध्ये याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले. त्यामुळे फक्त गरीब नव्हे तर उच्चमध्यमवर्गीयांनाही लक्ष्य करण्याचे तंत्र आता अमलात येऊ लागले आहे. नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपनीतील बीपीओ सेंटरमध्ये हा कॉर्पोरेट जिहादचा नंगा नाच सुरू होता. अखेर काही पीडितांनी हे भयानक वास्तव समोर आणल्यानंतर या सगळ्या घृणास्पद प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. यात आतापर्यंत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून हे सगळे या बीपीओ सेंटरमधील टीम लीडर आहेत. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी आरोपींची नावे आहेत तर पीडित हे हिंदूच आहेत. यावरून हे सगळे रॅकेट कसले आहे हे स्पष्ट होते. हे सगळे टीम लीडर असल्यामुळे अर्थातच, ते याठिकाणी आपला प्रभाव पाडून आपल्या अधिकारांचा गैरवापर करून हे धर्मांतरणाचे रॅकेट चालवत होते. नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे या प्रकरणात दाखल केलेले आहेत. जे पीडित आहेत त्यात ८ महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. मात्र ही पीडितांची संख्या ५० किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कॉर्पोरेट जिहादचा हा प्रकार नवा असला तरी त्याची मोडस ऑपरेंडी ही तीच आहे. इथे फक्त वेगळ्या वेशभूषेचा मुद्दा आहे. उच्चभ्रूंचा वेष परिधान करून काम मात्र त्याच मानसिकतेतून करायचे हा या कॉर्पोरेट जिहादींचा फंडा आहे. या घटनेतील पीडितांच्या म्हणण्यानुसार त्यांना नोकरीची गरज लक्षात घेऊन त्यांना या जाळ्यात ओढले गेले. तुम्ही हिंदू धर्मात आहात हे कसे खेदजनक आहे, हे पीडितांना पढवण्यात आले. किंबहुना, धर्माची थट्टा उडवण्यात आली. महिलांनी लिप्स्टिक लावणे कसे चुकीचे, बुरखा घालणे किंवा हिजाब परिधान करणे कसे योग्य हे पटविण्यात आले. नमाज अदा करण्यास सांगण्यात आले, रोजे ठेवण्यास मजबूर करण्यात आले. हे सगळे एकाच दिवसात घडलेले नाही. या जिहादींच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये कुणाला टार्गेट करायचे, कसे टार्गेट करायचे याची चर्चा झालेली आहे. त्यातून सावज हेरले गेले आहे. त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये आणून त्यांच्याशी संवाद साधला गेला आणि हळूहळू आपल्या जाळ्यात अलगद अडकल्यावर त्याच्यावर धर्मांतरणासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले.
हे ही वाचा:
इराणचे नेते मोज्तबा खामेनींच्या चेहऱ्याला गंभीर दुखापती, पायही निकामी?
युद्धाचा धोका वाढला तरी भारत ‘सुरक्षित’!
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका
रणवीर सिंगने घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट
एकदा का ती व्यक्ती जाळ्यात सापडली की तिलाच आपल्यासोबत असलेल्या हिंदू सहकाऱ्यांबद्दल मनात द्वेष, अस्पृश्यपणाची भावना निर्माण होऊ लागली. त्यांच्यासोबत जेवण घेण्यात, त्यांच्यासोबत बोलण्यातही त्यांना लाज वाटू लागली. ही पहिली पायरी पार केली की, मग या तरुणांना प्रामुख्याने तरुणींना त्यांच्या कुटुंबियांपासून तोडण्याची दुसरी पायरी सुरू केली जाते. त्यात हिंदू धर्माबद्दल हिणकस भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करून घरात बंडखोरी करण्यास प्रवृत्त केले जाते. एकदा का ती तरुणी घरापासून वेगळी झाली, आपल्या कुटुंबाशी असलेले पाश दूर झाले की तिला आणखी जाळ्यात अडकवणे सोपे होते, हेच इथेही घडले. मग लैंगिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून धर्म बदलण्यास प्रवृत्त करणे, हे प्रकार सुरू होतात आणि त्या तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हे या पीडित तरुणींच्या बाबतीतही घडले. नाशिकच्या या प्रकरणात तरुणही या रॅकेटमध्ये अडकला.
विशेष म्हणजे या कंपनीची एचआर असलेली तरुणी ही हिंदू. तिनेही या सगळ्या प्रकाराकडे काणाडोळा केल्याचा आरोप आहे. कारण अशा काही तक्रारी आल्यावर कारवाई केली तर आपल्याला इस्लामबद्दल तिटकारा अर्थात इस्लामोफोबिया आहे, असा समज निर्माण होईल, यातून त्या एचआर प्रमुख असलेल्या तरुणीने कारवाईकडे दुर्लक्ष केले. असे काही आपल्या कंपनीत घडलेच नाही, असा समज निर्माण करण्यात या एचआर प्रमुखाचाही हातभार होता, असा आरोप आहे. त्यातून या गुन्हेगारीला बळ मिळाले. त्यामुळे एचआरमधील ही तरुणीही यात तेवढीच जबाबदार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
गंभीर बाब ही आहे की, या सगळ्या अटक केलेल्या लोकांना न्यायालयात नेण्यात आले तेव्हा त्यांचे समर्थन करायला शेकडो लोक न्यायालयापर्यंत होते. याचा अर्थ, अशापद्धतीने लैंगिक शोषण, बलात्कार, लग्नाचे आमिष, त्यासाठी फसवणूक, खोटी ओळख हे सगळे मान्य असलेला मोठा समुदाय आहे, जो अशा गुन्हेगारीला योग्य ठरवत आहे, त्याला मान्यता देत आहे, हे भयंकर आहे.
अशा घटनांमध्ये पकडण्यात आलेल्या जिहादी मानसिकतेच्या तरुणांच्या चेहऱ्यावर कोणतीही पश्चात्तापाची रेषा उमटलेली दिसत नाही, ही सर्वाधिक गंभीर बाब आहे. कारण यांनी केलेले गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य हे त्यांच्यासाठी धर्माचे कार्य आहे. या सक्तीने, फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतरणाविरोधात महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर झाले आहे. त्यात दोषी ठरणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. मात्र केवळ कायद्याने धर्मांतरणाचे हे नवनवे प्रयोग थांबणारे नाहीत, हे स्पष्ट होते आहे. कारण हे धर्माचे कार्य आहे, असे या जिहादी मानसिकता असणाऱ्यांना बिंबवले जाते. त्यासाठी त्यांची तुरुंगातच जाण्याची मानसिकता तयार करून घेतली जाते. हे धर्मासाठीच आपण करत आहोत, या भावनेतून हे गुन्हेगार लव्ह जिहाद, लँड जिहाद, कार्पोरेट जिहाद करत असतात. त्यामुळे कायद्याचा दंडुका त्यांच्यावर किती परिणामकारक ठरेल हे सांगता येत नाही. त्यासाठी हिंदूंनी सावध होण्याचीच आता गरज आहे. कायदा आपले काम करीलच पण सावधगिरी बाळगणे प्रत्येक कुटुंबाच्या हाती आहे. कारण आता हे सगळे हिंदूंच्या उंबरठ्यापर्यंत आले आहे.
दुकाने, वस्त्या, इमारती, ठेले, फेरीवाले, कुरियर करणारे, खाद्यपदार्थ पोहोचवणारे अशा कोणत्याही माध्यमातून असा जिहाद करण्याची मोडस ऑपरेंडी आता सुरू झालेली आहे. कॉर्पोरेट जिहाद हा त्याचा नवा आविष्कार आहे एवढेच. आता तुम्ही गरीब आहात, अडचणीत आहात हेच कारण पुरेसे नाही तर तुम्ही उच्चभ्रू समाजात वावरता, मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करता तर तिथेही हा जिहाद येऊन पोहोचला आहे.
यातून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दावे केले जात असले तरी हे फक्त हिंदूंचे धर्मांतरण करण्यासाठीच सुरू आहे हे आता पुरेसे स्पष्ट झालेले आहे. हिंदू मुले मुलींनी अशा सगळ्या प्रकारांपासून कसे सावध राहावे, कुठून मदत घ्यावी, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुलामुलींचे मित्रमैत्रिणी कोण, कार्यालयात असेल तर मुलांचे दैनंदिन जीवन व्यवस्थित आहे की नाही, त्यांना कोणती समस्या आहे का, शिक्षण घेत असताना तिथे कोणती समस्या आहे का, याचाही विचार करणे आवश्यक आहे. नाशिकच्या घटनेत पकडले गेलेले सगळे पुरुष कर्मचारी असले तरी या जिहादी कामांसाठी महिलांचा वापरही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. महिला, मुलींच्या माध्यमातून हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत आहेत. किंबहुना, लैंगिक शोषणातही अशा महिलांचा वापर केला जात आहे.महिला, मुलींच्या माध्यमातून विश्वास संपादन करणे अधिक सोपे आहे, हे लक्षात घेऊन लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद करण्याचे प्रमाण वाढत आहे, हा धोकाही लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
या सगळ्या कॉर्पोरेट जिहादच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असली तरी त्याला फारशी प्रसिद्धी मिळू नये, त्याबद्दल फारसे बोलले जाऊ नये किंवा त्याकडे दुर्लक्ष व्हावे असा प्रयत्न केला जात आहे. केरळ स्टोरीसारखे चित्रपट आल्यानंतर ते कसे प्रपोगंडा अर्थात प्रचारकी चित्रपट आहेत असा आरोप केला गेला होता, पण प्रत्यक्षात असे प्रकार घडत आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागल्याने सगळ्यांना त्याचे गांभीर्य आणि दाहक वास्तव याची जाणीव होऊ लागली आहे. पण तथाकथित पुरोगामी या सगळ्या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकारावर मूग गिळून गप्प आहेत. खरे तर या सगळ्या प्रकारात ही धर्मांतरणाचे नवनवे प्रकार आणणारे जिहादी मानसिकतेचे जेवढे घातक आहेत तेवढीच ही तथाकथित पुरोगामी, विचारवंत, लेखक, पत्रकार मंडळीही घातक आहेत. कारण हा धर्मांतरणाचा विषय निघाला की त्यांची बोलती बंद होते. नाशिकमधील या घटनेनंतर अशोक खरातचे प्रकरण दडपण्यासाठी किंवा त्यापासून लक्ष विचिलित करण्यासाठी कॉर्पोरेट जिहादच्या घटनेला हवा दिली जात असल्याचा जावईशोध याच पुरोगाम्यांनी, पत्रकारांनी लावलेला आहे. अशा जिहादी घटनांकडे हे तथाकथित पुरोगामी साफ दुर्लक्ष करतात, पण हिंदुत्वावर शिव्या घालण्याची संधी मिळाली की, त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. माध्यमातही नाशिकच्या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. याचा अर्थ हे प्रकार किती गंभीर आहेत याची जाणीव झाली आहे. नामांकित कंपन्यांमध्ये जर असे प्रकार होत असतील तर अन्य छोट्या कंपन्यांमध्ये काय स्थिती असेल याची कल्पना करता येईल.
