29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

Google News Follow

Related

भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
हे ही वाचा:
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी; रात्रीतच होणार जलद प्रवास

अमेरिका–इराण चर्चा इस्लामाबादमध्ये; कोणत्या मुद्द्यांवरून दोन्ही देश आमनेसामने?

समान नागरी कायदा, महिलांना दरमहिना ३ हजार रु…भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये संकल्प

रुपयाचा जोरदार कमबॅक! ₹९२.४१ प्रति डॉलरपर्यंत मजबुती

काही वृत्तांनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुग्णालय किंवा कुटुंबीयांकडून अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. आशा भोसले या भारतीय संगीतसृष्टीतील एक अत्यंत मोठं नाव आहे. त्यांनी हजारो हिंदी, मराठी आणि इतर भाषांतील गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या गायकीमुळे त्यांना देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर देशभरातून त्यांच्या चाहत्यांकडून आणि अनेक कलाकारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. सध्या ही घडामोड सुरूच असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा