‘मी बुडाला पाय लावून पळणार’, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच पत्रकार परीषद घेऊन जाहीर केले होते. शब्द वेगळे वापरले असतील, परंत आशय हाच होता. ते जे काही म्हणाले ते रेकॉर्डवर आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेच्या परीसरात पत्रकारांशी बोलनाता राहुल यांना आव्हान दिले, ‘कोणत्याही विषयावर बोलायला मी तयार आहे, तुम्ही फक्त चर्चेला तयार असल्याचे लिहून द्या.’ राहुल गांधी या आव्हानाचा स्वीकार कऱणार नाही, याची अमित शहा यांना खात्री असावी. ‘आम्हाला गृहमंत्र्यांचे लेक्चर ऐकायचे नाही’, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले, अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे केली. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमारामुळे राहुल गांधी आधीच बॅकफूटवर आले होते, त्यात त्यांच्या एका फोटोबाबत भाजपा नेत्याने केलेल्या टीप्पणीमुळे ते अधिक पिसाटले असण्याची शक्यता आहे.
काँग्रेस हा विषवृक्ष आहे आणि राहुल गांधी या झाडाला आलेले सगळ्यात विषारी फळ. विरोधी पक्षनेता म्हणून संसदेत तर्कसंगत चर्चा घडवण्यावर त्यांचा कधीच भर नसतो. कारण चर्चा करताना मुद्दे मांडावे लागतात, तर्क द्यावे लागतात. राहुल गांधी यांच्याकडे या दोहोंचा दुष्काळ आहे. त्यांना मुद्देसूद बोलता येत नाही. डोळ्यांमध्ये कायम दिसणारा प्रचंड गोंधळ, विचित्र अंगविक्षेप करत तोंडाला येईल ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचे, उत्तरे ऐकण्याची वेळ आली की पळ काढायचा, अशी त्यांची रीत आहे. जेव्हा केव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांचे उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात थांबले तेव्हा त्यांचा चेहरा पाटणकर काढा प्यायल्या सारखा दिसला आहे.
काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात जो गोंधळ घातला, त्याचा परीणाम असा झाला की सभागृहात ९ विधेयके फक्त ५२ मिनिटात मंजूर झाली. विरोधी पक्षा नादान असला तरी सरकारला जनतेची कामे मार्गी लावायची आहेत. चर्चेशिवाय आवाजी मतांनी विधेयके मंजूर करून घेण्यात आली. एकेका विधेयकावर सरासरी ६ मिनिटे चर्चा झाली. यात किमान २ मिनिटे चर्चा झालेल्या विधेयकाचाही समावेश आहे. कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयक जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. हे विधेयक मंजूर होत असताना सभागृहात गोंधळ घालणारे काँग्रेसवाले आता जागे झाले असून मीडियाच्या समोर सरकारला प्रश्न विचारतायत, ‘
हे ही वाचा:
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आता रशियाच्या बाजूने लढणार
सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’! सिंडारोववर दमदार विजय
ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाच्या मुसक्या आवळल्या
व्हीसा आणि मास्टर कार्ड या कंपन्यांना सोयीचे व्हावे म्हणून अमेरिकेच्या दबावामुळे यूपीआय व्यवहारावर केंद्र सरकारने शुल्क आकारले असून ग्राहकाला यामुळे छुपे शुल्क भरावे लागणार असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. मुळात हे आरोप बिनबुडाचे आहेत.
काँग्रेसला जर जनतेचा इतका कळवळा असता, तर विधेयक सादर झाल्यानंतर संसदेत आवाज उठवला पाहीजे होता. सरकारला धारेवर धरले पाहीजे, होते. माकपाचे जॉन ब्रिटास यांनी प्रश्न विचारला, अर्थमंत्री निर्मला सितारमण उत्तर द्यायला उभ्या राहील्या ते हे महाशय पळाले. उत्तर देताना निर्मला सितारमण यांनी त्यांचा उल्लेख ‘कावर्ड’ असा केला आहे. यूपीआय पेमेंट ही मोफत सार्वजनिक सुविधा म्हणून विकसित कऱण्यात आल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. सर्वसामान्य नागरीक आणि लहान किराणा व्यापारी यांना हे शुल्क लागू होत नाही, भविष्यात मोठ्या व्यवहारांवर असे शुल्क आकरण्याचा विचार होऊ शकतो, असे हा कायदा सांगतो.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सुधारणा विधेयक, एमएसएसई विकास सुधारणा विधेयक, सर्वोच्च न्यायालय (न्यायमूर्तिंच्या संख्ये संदर्भात)सुधारणा विधेयक, वंदेमातरम विधेयक, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बॅंक दस्तेवज पुरावा, विधेयक, केरळ नामांतर विधेयक अशी ही महत्वाची विधेयके काँग्रेसच्या गोंधळामुळे चर्चेविना मंजूर झाली. आता काँग्रेसचे नेते मीडियासमोर या विधेयकांच्या नावाने बोटे मोडत आहेत. ज्यांना संसदेत विरोध कऱण्याची संधी होती, बोलण्याची संधी होती आणि जे हे विधेयक मांडले जात असताना फक्त धिंगाणा करत होते, त्यांनी आता ही विधेयके मंजूर झाल्यानंतर बोलून उपयोग काय?
ही राहुल गांधी यांची नीती आहे. राहुल गांधी चर्चेला घाबरून पळ काढतायत आणि दावा करतायत की पंतप्रधान आणि गृहमंत्री घाबरले. वस्तूस्थिती ही आहे की, राहुल गांधी घाबरत घाबरत दिवस काढतायत. दुहेरी नागरीकत्व, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली चुकीची माहिती, नॅशनल हेराल्ड प्रकरण अशा अनेक ठिकाणी ते गुंतलेले आहेत. कधीही त्यांची राजकीय विकेट पडू शकते अशी स्थिती आहे.
भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांचा पिकनिकच्या फोटोवर टीप्पणी केली. विदेशातील पिकनिकमध्ये या फोटोत तुमच्या सोबत कोण आहे? या प्रश्नामुळे राहुल गांधी किती पिसाटले असतील हे काँग्रेस प्रवक्त्यांच्या शिवराळ भाषेवरून उघड झाले. काँग्रेसच्या गटारमुख प्रवक्त्या गिरीराज सिंह यांना लिच्चड म्हणाल्या. त्या फोटोमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या मित्राचा परीवार असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीराज यांच्या प्रश्नात असे चिडण्यासारखे काय होते, ज्या काँग्रेसवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीबाबत शंभरवेळा जाहीर विधाने केली आहे, त्यांना राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारला तर इतके तिरमिरायला काय झाले. त्यांच्या वैयक्तिक आय़ुष्यात इतके काय गूढ आहे की, त्यांना आपली प्रत्येक विदेशवारी झाकून ठेवावी लागते, ते कुठे जातात, काय करतात, याबाबत कोणालाही ते कळू देत नाहीत. इतकी गुप्तता पाळण्याचे कारण काय? ते आयएसआय़,सीआयएचे हस्तक, दहशतवादी आणि भारतविरोध्यांना भेटतात काय?
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा असा गैरसमज आहे की, प्रश्न त्यांचाच विचारता येतात. इतरांनी प्रश्न विचारले की मग यांना राग येतो.
विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, अशा थापा ते आंदोलनाच्या पहील्या दिवसापासून मारतायत. झारखंडबद्दल मात्र त्यांनी मळी भरली आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे अमित शहा यांच्याकडून हवीत म्हणून तुम्ही गोंधळ घालत होतात ना? मग आता अमित शहा बोलायला तयार आहेत, तर तुम्ही ऐकण्याचीही तयारी ठेवा. आता अमित शहांचा राजीनामा का मागतायत?
सुरूवातीला मागणी फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमान्याची होती, त्यांचा राजीनामा झाल्यानंतर अमित शहा यांना निवेदन करायला सांगा नाही तर सभागृह चालू देणार नाही, हे सुरू झाले. आता अमित शहा बोलायला तयार आहेत, तर राहुल गांधी त्यांचा राजीनामा मागतायत. शहांनी राजीनामा दिला तर ते पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी संसदेत नवा तमाशा सुरू करतील. जनतेने लोकसभा निवडणुकीत नाकारालेला हा रिजेक्टेड माल सरकारला गन पॉईंटवर नाचवू पाहातो आहे. सत्ताधाऱ्यांनी कायम संयमाने आणि नम्रपणाने काम केले पाहीजे. मोदी सरकार तसेच चालले आहे, परंतु एक दिवस या संयमाचा कडेलोट होणार हे लिहून ठेवा. राहुल गांधी यांचे निवृत्तीनंतरचे दिवस बरे असण्याची शक्यता नाही.
संसेदवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर राहुल गांधी म्हणतायत, त्याप्रमाणे गोळीबार झालेला नाही. गोळीबार करण्याचे आदेश सत्ताधारी असताना इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी दिले होते. इंदीरा गांधी यांनी संतांचे, मुलायम यांनी कारसेवकांचे बळी घेतले होते. त्यांनी तर मग राजकीय संन्यास घेतला पाहीजे होता. राजीनामा तर दूरच दोघांनी आपल्या कृत्यांचे समर्थन केले होते आणि इथे पॅलेट गन चालवल्या म्हणून राहुल गांधींना गृहमंत्र्यांचा राजीनामा हवाय? स्वत:च्या हिंदूविरोधी खानदानाचे प्रताप तर आठवून पाहा मागणी करण्यापूर्वी.
उत्पन्न कर विधेयकाबाबत मोदी सरकारवर अमेरिकेचा दबाव होता, असे काँग्रेस नेते म्हणतायत, एफसीआरए विधेयकाबाबत सगळ्या विरोधकांवर अमेरिकेचा दबाव होता का? कारण भारताला धमकावणाऱे रिपल्बिकन पक्षाचे काँग्रेसमन रिले मूर यांच्या सूरात सूर मिळवत सगळेच या विधेकाचा विरोध करत होते. काँग्रेसच्या दबावामुळे राहुल गांधी रिले मूर यांची भाषा बोलत होते काय?
हे विधेयक सरकारने संयुक्त संसदीय समितीकडे सोपवले आहे. परंतु काँग्रेसने मागणी केल्या प्रमाणे हे मागे तर घेतले जाणार नाही. या नाही तर पुढील अधिवेशनात ते मंजूर होईलच.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
