पाकिस्तानातील मुसलमानांवर चालणारा वरवंटा पाहूनही या देशातील कट्टरतावादी मुसलमान धडा घ्यायला तयार नाहीत. हिंदूंशी जुळवून घेणे तर दूरच, जमेल तिथे हिंदूंचा विरोध करायचा, असे यांचे धोरण आहे. जेव्हा जेव्हा या देशात हिंदुत्व किंवा राष्ट्रवादाशी फारकत घेणारी आंदोलने होतात, हिंदू समाजात फूट पाडणारी जातवादी आंदोलने होतात तेव्हा मोठ्या संख्येने या आंदोलनात टोपीवाले-दाढीवाले पोहोचतात. अगदी न बोलावता. जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांचे तथाकथित आंदोलन सुरू होते तेव्हा रोज हजारोंना बिर्याणी वाटणारा जुनेद झारखंडमध्ये जरा उशीराच पोहोचला. तोही जुनेद इथे का येत नाही, असा ओरडा झाल्यानंतर. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याची बिर्याणी नाकारली. झारखंडच्या विद्यार्थ्यांना जुनेदची बिर्याणी नकोशी का झाली याची कारणे समजून घेण्याची गरज आहे.
झारखंडमध्ये २५ जुलैपासून जेपीएससी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडीयमवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारविरुद्ध आंदोलन सुरू झाले. ३८ दिवस आंदोलन सुरू आहे. ही परीक्षा रद्द करा, परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा, परीक्षा पद्धतीत आमुलाग्र सुधारणा करा, अशा आंदोलकांच्या मागण्या नाहीत. कुठेही तख्तापलटचा अजेंडा नाही, कोणताही राजकीय अभिनिवेश नाही.
काही बाबतीत मात्र आंदोलक ठाम आहेत. इथे डफली बडवत नाम रहेगा अल्ला का, हमे चाहीये आझादी, ब्राह्मणवाद से आझादी, अशा फुटीर घोषणा देण्याची मुभा नाही. कमल ३७० ची पुनर्स्थापना करण्याचा आग्रह करणाऱ्या आंदोलकांना इथे येण्याची परवानगी नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला, त्यांची कॉलर पकडून त्यांना हाकलून देण्यात आली. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडीयाची कार्यकर्ती नेहा बोरा हे त्याचे ताजे उदाहरण आहेत. इथे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी किंवा हिंदूविरोध कऱण्यासाठी येऊ नका, असा या विद्यार्थ्यांचा स्पष्ट संदेश आहे.
झारखंडमध्ये मुस्लीम नाहीत, अशातला भाग नाही. १४.५ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. इथे मानवतेच्या बाता करीत एकही जुनेद तोपर्यंत आला नाही, जोपर्यंत जुनेद इथे का येत नाही, असा सवाल अमन चोप्रासारख्या पत्रकाराने विचारायला सुरूवात केली नाही. आंदोलक विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था मंदीरांतून करण्यात आली. जंतर मंतरवर बिर्याणी वाटताना जुनेद मानवतेचे कारण सांगत होता. तिथे जुनेद आणि त्याच्या भाईबंदांच्या चेहऱ्यावरून मानवता ओसांडून वाहत होती. विद्यार्थ्यांचा पुळका व्यक्त करण्यात येत होता. झारखंडमध्ये तो यायला आंदोलनाचा १४ वा दिवस उजाडला.
हे ही वाचा:
ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनाला भारताचा स्पष्ट विरोध
महिला विधेयकावरून राहुल गांधी-रिजिजू भिडले
भारताच्या परकीय चलनसाठ्यात विक्रमी झेप!
चीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक आंदोलने झाली. सीएए, ट्रिपल तलाक, वक्फ कायद्याच्या विरोधात मुस्लिमांचा पुढाकार होता. परंतु त्यांचा फारसा संबंध नसलेले शेतकरी आंदोलन, महाराष्ट्रातील जरांगे आंदोलन, जंतर मंतरवर झालेले कॉकरोच आंदोलन त्यांचा सहभाग ठसठशीतपणे दिसणारा होता. मानवतेच्या नावाखाली या आंदोलनात मुस्लीम उतरले. आंदोलनांना त्यांनी भावनिक पाठींबा दिला. शेतकरी आंदोलनात तर जेवणाखाण्याची पंचतारांकीत व्यवस्था असताना मुस्लिमांनीही भोजन व्यवस्था केली होती. लंगर हा गुरुद्वारात लावला जातो. परंतु तिथे मुस्लिमांनी केलेल्या भोजन व्यवस्थेचा उल्लेख मीडियाने लंगर असा केला. आंदोलनाच्या ठिकाणी मुस्लिमांनी नमाज पढला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मौलाना सज्जाद नोमानी उतरला होता. मुस्लीमांच्या सहभागामुळे जरांगेला तर हर्षवायू झाला होता. वास्तविक मराठा आंदोलनाशी मुस्लिमांचा काडीचाही संबंध नव्हता. परंतु तो जोडण्यात आला. मुस्लीम भाईचारा आणि मानवतेच्या नावाखाली जरांगेला कडकडून मिठ्या मारत होते. हा भाईचारा झारखंडमध्ये तेवढा जाणवला नाही. कारण स्प्ष्ट आहे.
या देशातील मुस्लीम भावनिकदृष्ट्या हिंदूंशी कायम फारकत घेत आलेला आहे. गजवा ए हिंदच्या कट्टरवाद्यांच्या उद्दीष्टात हिंदूंची एकजूट आडवी येते आहे. त्यामुळे जिथे हिंदू एकत्र येतो तिथे कट्टरवादी उपद्रव निर्माण करतात. रामनवमी, गणेश चतुर्थीच्या मिरवणुकी पोलिस बंदोबस्तात काढाव्या लागतात. कारण मशिदीतून, संवेदनशील वस्तीतून दगडफेक केली जाण्याची, हल्ला होण्याची भीती असते. संपूर्ण वंदेमातरम बाबत संसदेतच्या दोन्ही सदनात विधेयक मंजूर झाले. परंतु मुस्लीम पर्नल लॉ बोर्डापासून जमात ए इस्लामीपर्यंत सर्व संघटना आणि देशातील मुस्लिमांनी या विधेयकाचा विरोध केला आहे. जिथे जमेल तिथे हिंदूंच्या आस्थांना विरोध करण्याचा मुस्लिमांचा प्रयत्न असतो. तुमचे हिंदूंशी जमत नाही, म्हणून १९४७ मध्ये देशाच्या जमिनीचा एक तुकडा काँग्रेसने तुम्हाला बहाल केला, तरीही उरलेल्या भूभागावर आमचीच मनमानी चालली पाहिजे असा मुस्लिमांचा हेका आहे. काँग्रेसच्या काळात तो पुरवला गेला. हिंदू समाजाच्या जेव्हा हे लक्षात आले, तेव्हा हिंदू समाजाने एकजूट दाखवत काँग्रेसला या देशाच्या सत्तेवरून भिरकावले. डाव्यांचाही बंदोबस्त केला. एकगठ्ठा मुस्लीम मतांची जादू संपवून टाकली. प.बंगालमध्ये भाजपाचे राज्य आल्यापासून मशीदीवरील भोंगे खाली उतरवले जात आहेत. बांगलादेशी पळ काढताना दिसत आहेत.
या सगळ्या घडामोडींमुळे मुस्लीम अस्वस्थ आहेत. हे सगळे हिंदू एकतेमुळे शक्य झाले हे त्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे जिथे जिथे हिंदूमध्ये फूट पडताना दिसते, तिथे मुस्लीम एकवटतात. हिंदुत्वाबाबत आकस असणाऱ्या गटासोबत उभे राहतात.
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, तिथे कुठेही हिंदू विरोध दिसत नाही. मोदी हटावच्या घोषणा नाहीत. भाजपाला शिव्या नाहीत. कोणत्याही जातीबाबत विद्वेष व्यक्त होत नाही. उलट जय श्रीराम,वंदेमातरमच्या घोषणा दिल्या जातायत. हिंदू विरोधींच्या पेकाटात लाथ घालण्यात येत आहे. त्यामुळे तिथे जाऊन आपला अजेंडा पूर्ण होत नाही, हे मुस्लीमांच्या लक्षात आले. त्यामुळे या आंदोलनात तुम्हाला एकही दाढीवाला टोपीवाला दिसत नाही. कोण्या पत्रकाराने ओरड केल्यानंतर जुनेद इथे दाखल होतो. कारण नाही आला तर पोलखोल होते. लिब्रांडू पत्रकार अजीत अंजूमने जुनेदची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यानेच माहिती दिली आहे. पत्रकार अमन चोप्रा विचारत होता, जुनेद इथे का पोहोचला नाही? जुनेद साळसूदपणे म्हणतो मी इथे मानवतेसाठी आलो आहे, विद्यार्थ्यांसाठी आला आह. परंतु दोघांच्या संवादात ही बाब उघड होते, अमन चोप्राने जुनेदला जाहीरपणे प्रश्न विचारला त्यानंतर तो इथे पोहोचला. अन्यथा इथे तो पहील्या दुसऱ्या दिवशी पोहोचला असता.
जंतर मंतरवरील आंदोलन देशाच्या प्रत्येक गावखेड्यात पसरले पाहिजे, असे म्हणणारे योगेंद्र यादव इथे फिरकला नाही. शबाना आझमी इथे आली नाही. दुबई पोशित बॉलिवूडच्या तारे तारकांनी झारखंडबाबत एक शब्दही उच्चारला नाही. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर रावण कोणीही नाही.
विदेशातील एकाही आंदोलनजीवीने या आंदोलनासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली नाही. या आंदोलनात नरेंद्र मोदी यांचा निषेध कऱण्याची संधी नसल्यामुळे ग्रेटा थनबर्गपर्यंत सुद्धा हा विषय आणि पाकिट दोन्ही पोहोचले नाही. सौरव दासचे समर्थन करणारी नॉर्वेची उठवळ पत्रकार हेली लिंग हीच्या पर्यंतही झारखंडचा विषय पोहोचला नाही.
याचे कारण आहे या देशात आणि विदेशीत कॉग्रेसने निर्माण केलेली डावी इकोसिस्टीम मुस्लिमांना त्यांच्या राजकारणासाठी सोयीची वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा या इकोसिस्टीमला बळ देण्यासाठी मुस्लीम रस्त्यावर उतरतात. किंवा जेव्हा मुस्लिमांना आवश्यक असते तेव्हा डावे, लढायला उतरतात. दिल्ली दंग्यातील आरोपी उमर खालिद असो, वा गुजरातमध्ये दंगा करणाऱे मुस्लीम. दोघांसाठी न्यायालयात, मीडियात किल्ला लढवणारी डाव्यांची इकोसिस्टीमच होती. थोडक्यात देशातील या दोन्ही शक्तींमध्ये कमालीचा ताळमेळ आहे. या दोघांना झारखंडचे आंदोलन पाठिंबा देण्या इतपत उपयुक्त वाटत नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
