इराणमध्ये खामेनीविरोधी निदर्शनांमध्ये २७ निदर्शकांचा मृत्यू

वाढत्या महागाईवरून निदर्शने; संतप्त नागरिक रस्त्यवर

इराणमध्ये खामेनीविरोधी निदर्शनांमध्ये २७ निदर्शकांचा मृत्यू

इराणमध्ये वाढत्या महागाईवरून निदर्शने सुरू असताना तेहरान बाजारात निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराचा वापर केला. या कारवाईत दोन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच मंगळवारी इराणी रियालचे मूल्य पुन्हा घसरले आणि परकीय चलनांच्या तुलनेत आणखी एका विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले.

नॉर्वेस्थित स्वयंसेवी संस्था इराण ह्युमन राईट्स (IHR) नुसार, सुरक्षा दलांनी किमान २७ निदर्शकांना ठार मारले आहे, ज्यात १८ वर्षांखालील पाच अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, या कारवाई दरम्यान, सुरक्षा दलातील सदस्य देखील मारले गेले आहेत, ज्यात मंगळवारी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या एका पोलिसाचाही समावेश आहे. देशभरात सरकारविरोधी निदर्शने सुरू असताना अब्दानानमध्येही मोठ्या संख्येने लोक जमले आहेत . शहरातील रस्त्यांवर हजारो निदर्शकांनी गर्दी केली होती. २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय आर्थिक केंद्र असलेल्या तेहरान बाजारातील व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने निषेधाची लाट सुरू झाली आणि नंतर ती इतर भागात, विशेषतः पश्चिम इराणमध्ये पसरली, जिथे कुर्दिश आणि लोर अल्पसंख्याक गट राहतात.

हे ही वाचा..

मशिदीजवळील अतिक्रमण हटवताना दगडफेक; पाच पोलीस जखमी

टी-२० विश्वचषकासाठी भारतात जा अन्यथा गुण गमवा!

अभिनेता विजयला सीबीआयकडून आले बोलावणे!

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

इराणच्या शेवटच्या राजाचे पुत्र, निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणी जनतेला कृतीचे पहिले जाहीर आवाहन केले आहे. अशांततेदरम्यान जारी केलेल्या संदेशात, रेझा पहलवी म्हणाले, “गुरुवार आणि शुक्रवार, ८ आणि ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता तुम्ही जिथे असाल तिथे, रस्त्यावर असो किंवा तुमच्या घरातून असो, मी तुम्हाला याच वेळी जप सुरू करण्याचे आवाहन करतो. तुमच्या प्रतिसादाच्या आधारे, मी पुढील कृतीचे आवाहन जाहीर करेन.”

Exit mobile version