गाझा हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार!

आयडीएफकडून दहशतवादी म्हणून वर्णन

गाझा हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार!

रविवारी (१० ऑगस्ट) रात्री उशिरा गाझा सिटीवर इस्रायली हवाई हल्ल्यात अल जझीरा अरेबिकचे प्रतिनिधी अनस अल शरीफ आणि इतर चार पत्रकार ठार झाले, अशी माहिती कतारच्या प्रसारकाने दिली. हा हल्ला अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जिथे अनेक माध्यम कर्मचारी तैनात होते.

अल जझीरा नुसार , शिफा हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तंबूला टार्गेट करून झालेल्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अल जझीराचे प्रतिनिधी मोहम्मद कारेकेह आणि कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोहम्मद नौफल आणि मोआमिन अलिवा यांचा समावेश आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) ने अनासला दहशतवादी म्हणून वर्णन केले आहे. इस्रायली लष्कराच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हमासचा दहशतवादी अनास अल-शरीफ, जो स्वतःला अल जझीराचा पत्रकार म्हणून ओळखतो, तो हमासच्या दहशतवादी गटाचा प्रमुख होता आणि त्याने इस्रायली नागरिकांवर आणि आयडीएफ सैनिकांवर रॉकेट हल्ले केले होते.

आयडीएफने म्हटले आहे की, गाझामधून जप्त केलेली गुप्तचर यंत्रणा आणि कागदपत्रे, ज्यात रोस्टर, दहशतवादी प्रशिक्षण यादी आणि पगाराच्या नोंदींचा समावेश आहे, हे सिद्ध करतात की अनस अल-शरीफ हा अल जझीराशी संबंधित हमासचा कार्यकर्ता होता. दरम्यान, पॅलेस्टिनी पत्रकार गटांनी या हत्यांचा निषेध केला आणि संघर्षादरम्यान प्रेस स्वातंत्र्याला मोठा धक्का असल्याचे वर्णन केले.

हे ही वाचा : 

तर आमच्यासह अर्धे जग नष्ट करू…

आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो – राजनाथ सिंह

चेन्नईमध्ये एअर इंडियाचे विमान थोडक्यात बचावले

तुमचा कचरा नको,ट्रम्प यांचे डील झिडकारले…

 

Exit mobile version