अ‍ॅमेझॉन २०३० पर्यंत भारतात करणार ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

अ‍ॅमेझॉन २०३० पर्यंत भारतात करणार ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

अ‍ॅमेझॉनने मंगळवारी जाहीर केले की ते २०३० पर्यंत भारतातील आपल्या सर्व व्यवसायांमध्ये ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहेत. या निर्णयामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित परिवर्तनामध्ये आणि रोजगार निर्मितीमध्ये अ‍ॅमेझॉनचा दीर्घकालीन सहभाग आणखी वाढणार आहे.

ही नवीन गुंतवणूक मागील १५ वर्षांत भारतात करण्यात आलेल्या जवळपास ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आधारित आहे. १० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील सहाव्या ‘अ‍ॅमेझॉन संभव’ शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात कन्सल्टिंग फर्म कीस्टोन स्ट्रॅटेजीचा आर्थिक परिणाम अहवालही सादर करण्यात आला.

या अहवालानुसार, पायाभूत सुविधा विकास आणि कर्मचारी वेतनासह अ‍ॅमेझॉनच्या एकूण गुंतवणुकीमुळे ते भारतातील सर्वात मोठे परकीय गुंतवणूकदार बनले आहे, ई-कॉमर्स निर्यातीसाठी सर्वात मोठे सक्षमकर्ता आणि देशातील शीर्ष रोजगार निर्मात्यांपैकी एक ठरले आहे.

कंपनीने सांगितले की भविष्यातील गुंतवणूक तीन प्रमुख स्तंभांवर केंद्रित असेल — कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे डिजिटल रूपांतरण, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मिती — जे भारताच्या व्यापक डिजिटल आणि आर्थिक प्राधान्यांशी सुसंगत आहे.

अ‍ॅमेझॉनने भारतात मोठ्या प्रमाणावर भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, ज्यात फुलफिलमेंट सेंटर्स, वाहतूक नेटवर्क, डेटा सेंटर्स, डिजिटल पेमेंट्स पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

कीस्टोन अहवालानुसार, अ‍ॅमेझॉनने आतापर्यंत १.२ कोटींपेक्षा जास्त लहान व्यवसायांना डिजिटल केले आहे, २० अब्ज डॉलर्सच्या ई-कॉमर्स निर्याती सक्षम केल्या आहेत आणि २०२४ मध्ये सुमारे २८ लाख थेट, अप्रत्यक्ष, पूरक आणि हंगामी नोकऱ्यांना हातभार लावला आहे.

या नोकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान, ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा अशा क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यात स्पर्धात्मक वेतन, आरोग्य सुविधांचा लाभ आणि औपचारिक प्रशिक्षण देखील दिले जाते.

अ‍ॅमेझॉनचा आर्थिक प्रभाव त्याच्या थेट कर्मचार्‍यांपलीकडे पसरलेला आहे — पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, उत्पादन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये रोजगार निर्माण करताना हजारो लहान उद्योजकांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर व्यवसाय वाढवण्यास मदत करत आहे.

2030 पर्यंत आणखी 10 लाख नोकऱ्या

2030 पर्यंत अ‍ॅमेझॉन भारतात आणखी 10 लाख थेट, अप्रत्यक्ष, पूरक आणि हंगामी नोकऱ्या निर्माण करण्याची योजना आखत आहे. व्यवसाय विस्तार, फुलफिलमेंट आणि डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार, तसेच पॅकेजिंग, उत्पादन आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रातील मागणी यामुळे या नोकऱ्या निर्माण होतील.

अ‍ॅमेझॉनचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट (इमर्जिंग मार्केट्स) अमित अग्रवाल म्हणाले की कंपनीची भारतातील वाढ देशाच्या डिजिटल उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळलेली आहे.

“मागील 15 वर्षांपासून भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग होणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दृष्टीकोनाशी अ‍ॅमेझॉनची वाढ पूर्णपणे सुसंगत राहिली आहे,” असे अग्रवाल म्हणाले. “आम्ही भारतातील लहान व्यवसायांसाठी भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि ‘मेड-इन-इंडिया’ ला जागतिक स्तरावर नेले आहे.”

कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्यात आणि डिजिटल प्रवेशावर मोठा भर

दीर्घकालीन वचनबद्धतेचा भाग म्हणून अ‍ॅमेझॉनने जाहीर केले की ते भारतभर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहेत — व्यवसाय, ग्राहक आणि विद्यार्थ्यांसाठी एआय-साधने सहज उपलब्ध केली जातील.

Exit mobile version