इस्राएल दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट!

इस्राएल दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट!

दिल्लीतील इस्राएल दूतावासाच्या आवारात बॉम्बस्फोट झाला आहे. २९ जानेवारीच्या संध्याकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटाने दिल्लीतील इस्राएल दुतावासाच्या आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण दिल्ली पोलिसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

२९ जानेवारीच्या संध्याकाळी एकीकडे दिल्लीच्या विजय चौकात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे त्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्राएल दूतावासाच्या परिसरात बॉम्बस्फोटाची घटना घडली. या स्फोटाची तीव्रता कमी असाली तरीही दिल्लीतील अतिशय महत्वाच्या भागात आणि दूतावासाच्या काही शे मिटर अंतरावर हा स्फोट घडल्यामुळे हा बॉम्ब घटनास्थळी पोहोचला कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. या बॉम्बमध्ये आयएमडी चा वापर करण्यात आला आहे. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही काही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

या घटनेविषयी भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी इस्राएलच्या परराष्ट्र मंत्री गाबी ॲश्केनाझी यांच्याशी चर्चा केली असून भारत या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने बघतो असे सांगितले. इस्राएल दूतावास आणि राजदूत यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून दोषींना पकडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील असे जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Exit mobile version