अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद

अमेरिका आपली राजकीय आणि आर्थिक ताकद वापरून इतर देशांवर दबाव टाकत असल्याचा आरोप

अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे. व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. चीनने म्हटले आहे की, अमेरिका आपली राजकीय आणि आर्थिक ताकद वापरून इतर देशांवर दबाव टाकत आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या देशाशी राजनैतिक किंवा आर्थिक संबंध ठेवायचे हा प्रत्येक सार्वभौम देशाचा स्वतःचा अधिकार आहे. या निर्णयात बाहेरील देशांनी हस्तक्षेप करू नये. असे हस्तक्षेप करणे हे आंतरराष्ट्रीय नियमांना आणि संयुक्त राष्ट्र यांच्या तत्त्वांना विरोधात असल्याचे चीनने सांगितले.

चीनचा आरोप आहे की, अमेरिका व्हेनेझुएलावर निर्बंध लावत असून इतर देशांनाही तेच करण्यासाठी दबाव आणत आहे. या धोरणाचा फटका थेट व्हेनेझुएलाच्या सामान्य नागरिकांना बसत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. अशा प्रकारचा दबाव जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी घातक ठरू शकतो, असा इशाराही चीनने दिला आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी कारवायांत सामील असणाऱ्यांना दिलासा नाहीच

गाझियाबादमध्ये २९ टक्के तर नोएडामध्ये २४ टक्के मतदारांच्या नावांवर फुली

जमावापासून वाचण्यासाठी हिंदू व्यक्तीचा पाण्यात उडी मारल्याने मृत्यू

मतदार यादी सुधारण्यासाठी एसआयआर प्रक्रिया आवश्यक

चीनने स्पष्ट केले आहे की, व्हेनेझुएला सोबत असलेले त्यांचे संबंध कायदेशीर आणि पारदर्शक आहेत. हे संबंध कोणत्याही देशाच्या विरोधात नसून परस्पर सहकार्यावर आधारित असल्याचे चीनने म्हटले आहे.

या घडामोडींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील आधीच तणावपूर्ण संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. मोठ्या देशांनी दबावाचे राजकारण टाळून संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, अशी भूमिका चीनने मांडली आहे

Exit mobile version