“भित्रे शाहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचे नाव घ्यायला घाबरतात…” पाक खासदाराने सरकारला पाडले उघडे

खासदार शाहीद अहमद यांचा व्हिडीओ व्हायरल

“भित्रे शाहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचे नाव घ्यायला घाबरतात…” पाक खासदाराने सरकारला पाडले उघडे

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जबरदस्त दणका पाकिस्तानला बसला आहे. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतींनाही भारताने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये आता चांगलीच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या संसदेतही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या संसदेमध्ये पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग) खासदार ताहीर इक्बाल यांचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पाकिस्तानी खासदार शाहीद अहमद यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संसदेत बोलताना त्यांनी भारताकडून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांबद्दल पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावल्याचे दिसत आहे.

भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्याने पाकिस्तान पूर्णपणे गोंधळून गेला असून तिकडच्या नागरिकांमध्येही आता संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता पाकिस्तानमधील खासदारांनी त्यांच्याच सरकारविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेचा असाच एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये खासदार शाहीद हे स्वतःच्या सरकारला कोंडीत पकडताना दिसत आहेत.

खासदार शाहीद संसदेत म्हणत आहेत की, आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यासही घाबरत आहेत. ते घाबरट आहेत. टिपू सुलतान याचे वाक्य आठवते. एका लष्कराचे नेतृत्व सिंह करत असेल आणि त्या तुकडीत जर कोल्हे असतील तरी ते सिंहासारखे लढतात. परंतु सिंहाच्या गटाचा सरदार कोल्हा असेल तर ते सिंहही जिंकू शकत नाहीत. ते युद्धात पराभूत होतात. तुमचे नेतृत्व घाबरणारे असेल तर काहीच करु शकत नाही. पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान शाहबाज भित्रे असून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही घेऊ शकत नाहीत, ते घाबरले आहेत. असा पंतप्रधान किंवा नेता त्याच्या सैन्याला काय संदेश देऊ शकेल?

हे ही वाचा :

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सात दहशतवादी कंठस्नान

पाकचा खरा चेहरा उघड; आंतरराष्ट्रीय भागीदारांसमोर पसरले कर्जासाठी हात

पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

शाहीद अहमद हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी संसदेत पंतप्रधानांना घरचा आहेर दिला असून चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान आणि पाक सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.

Exit mobile version