टर्निंग पॉइंट यूएसएचे सह-संस्थापक आणि कट्टर राजकीय कार्यकर्ते चार्ली कर्क यांची अमेरिकेच्या युटा व्हॅली युनिव्हर्सिटी कॅम्पसवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते त्यांच्या अमेरिकन कमबॅक टूरदरम्यान तंबूमध्ये भाषण करत असताना ही घटना घडली. यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसने नाराजी प्रकट केली आहे.
माजी दक्षिण आफ्रिकी क्रिकेट कर्णधार फाफ डुप्लेसिस यांनी अमेरिकेतील शस्त्रास्त्र कायद्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्याने X वर लिहिले की, “चार्ली कर्क यांना श्रद्धांजली. मला अमेरिका कधीच समजणार नाही, प्रत्येकाला शस्त्र ठेवण्याचा अधिकार इथे का दिला जातो?”
दरम्यान, कर्क यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही, आणि तपास सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला “अमेरिकेसाठी काळा क्षण” असे संबोधले. त्यांनी आठवण करून दिली की, गेल्या वर्षी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता, तसेच २०२४ मध्ये युनायटेडहेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची हत्या झाली होती. कट्टर डाव्या हिंसाचाराने निरपराध लोकांना खूप मोठा फटका बसला आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
हे ही वाचा:
नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले
नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!
अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणात सहा जणांना अटक
भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या
अमेरिकेतील बंदुकीसंदर्भातील कायदा
२०२२ मध्ये अमेरिकन सिनेटने बंदूक सुरक्षा विधेयक मंजूर केले, जे वाढत्या गोळीबाराविरुद्धचे सर्वांत महत्त्वाचे पाऊल मानले गेले. हे विधेयक ६५-३३ मतांनी मंजूर झाले, ज्यामध्ये १५ रिपब्लिकन सिनेटरांनी पाठिंबा दिला होता. तत्कालीन अध्यक्ष जो बायडन यांनी या विधेयकाला मान्यता दिली.
विद्यमान कायद्यानुसार परवाना धारक विक्रेते फक्त २१ वर्षांवरील लोकांना हँडगन विकू शकतात. रायफलसारखी लांब बंदुका मात्र १८ वर्षांवरील लोकांना विकता येतात. खासगी विक्रेते १८ वर्षांच्या लोकांनाही हँडगन विकू शकतात; लाँग गन्स साठी वयाची अट नाही.
ट्रम्प यांची याबाबतची भूमिका
प्रचारादरम्यान त्यांनी NRA कार्यक्रमात सांगितले होते: “तुमच्या शस्त्रांवर कुणीही बोट ठेवू शकणार नाही.” त्यांनी सूचित केले होते की पुन्हा सत्तेत आल्यास गन लॉज वेगळ्या पद्धतीने हाताळतील.
