मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने जाहीर केले आहे की भारतासह पाच मैत्रीपूर्ण देशांच्या जहाजांवर होर्मुझची सामुद्रधुनी येथे कोणतीही नाकेबंदी लागू केली जाणार नाही. भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, पाकिस्तान, इराक या देशांच्या जहाजांनाही या संवेदनशील सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यात आला आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केलेली नाही. इराणशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या काही देशांच्या जहाजांना ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ते म्हणाले, “अनेक जहाजमालक किंवा त्या जहाजांचे मालक देशांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा अशी विनंती केली आहे. काही देश आमचे मित्र असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे आम्ही त्यांच्या जहाजांना आमच्या सशस्त्र दलांकडून सुरक्षित मार्ग दिला आहे.”
हे ही वाचा:
रसेल गेला… ग्रीन आला, पण ‘पावर’ कुठे?
जिंकलो रे! ट्रम्पना का करावी लागली ही घोषणा
वृंदावनमधील जीवनदीप आश्रमाचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण
गौतम गंभीर यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण
अराघची यांनी पुढे सांगितले की, “तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल—चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि भारत. काही दिवसांपूर्वी या देशांची जहाजे या मार्गातून गेली. इतर काही देशांनीही आमच्याशी समन्वय साधला आहे, आणि हा क्रम पुढेही, अगदी युद्धानंतरही सुरू राहील.”
मात्र त्यांनी स्पष्ट केले की अमेरिका, इस्रायल तसेच सध्याच्या मध्यपूर्व संघर्षात भूमिका बजावणाऱ्या काही आखाती देशांच्या जहाजांना या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
