न्यूयॉर्कमध्ये झळकतायत “Remember October 7” लिहिलेले होर्डिंग्ज! नेमके प्रकरण काय?

मोठे होर्डिंग्ज आणि मोबाईल ट्रकचा मोहिमेसाठी वापर

न्यूयॉर्कमध्ये झळकतायत “Remember October 7” लिहिलेले होर्डिंग्ज! नेमके प्रकरण काय?

इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक राजनैतिक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ७ ऑक्टोबर लक्षात ठेवा असा संदेश लिहिलेले मोठे होर्डिंग्ज आणि मोबाईल ट्रक ठेवण्यात आले आहेत. हे ट्रक्स आणि होर्डींग्स संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाभोवती आणि गजबजलेल्या टाइम्स स्क्वेअरभोवती ठेवण्यात आले आहेत. हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांची भीषणता आणि गाझामध्ये बंदिवान असलेल्या ४८ ओलिसांच्या दुर्दशेला अधोरेखित करणारी ही मोहीम असून जगभरचे लक्ष याकडे वेधले जात आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे ८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्यापूर्वी पीएमओ आणि पीएमच्या प्रवक्त्यांच्या युनिटने पुढाकार घेत ही मोहीम राबवली आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, जागतिक नेत्यांना आणि जनतेला हमासच्या क्रूरतेचा खरा चेहरा दिसावा.

“पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणापूर्वी, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांच्या युनिटने न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीभोवती आणि टाइम्स स्क्वेअरमध्ये मोठ्या होर्डिंग्ज आणि ट्रकवर सार्वजनिक राजनैतिक मोहीम सुरू केली आहे,” असे इस्रायली पीएमओने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट जागतिक नेत्यांना आणि जनतेला हमासने केलेल्या अत्याचारांची आणि गाझामध्ये ४८ ओलिसांना बंदिवान असलेल्या दहशतवादी संघटनेच्या क्रूरतेची आठवण करून देणे आहे, असेही त्यात पुढे म्हटले आहे.

हे ही वाचा:

गौरवशाली अध्यायाचा अंत: ६२ वर्षांच्या सेवेनंतर लढाऊ मिग- २१ विमानांना निरोप

पाकची नाचक्की; ट्रम्पनी शरीफ, मुनीरना गेटबाहेर ठेवले ताटकळत

सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!

ट्रम्प यांचा नवा टॅरिफ वार; औषधांवर १०० टक्के कर

प्रत्येक होर्डिंगवर आणि ट्रकवर “Remember October 7” हे वाक्य ठळकपणे लिहिले असून त्यासोबत एक QR कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यावर वापरकर्त्यांना ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या हल्ल्याचे दस्तऐवजीकरण होस्ट करणाऱ्या समर्पित वेबसाइटकडे नेण्यात येते.

Exit mobile version