भीषण भूकंपामुळे संकटात सापडलेल्या कोलंबियाच्या मदतीसाठी भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने २० टन मदतसामग्रीची पहिली खेपे रवाना केली असून, या मदतीत औषधे, वैद्यकीय उपकरणे, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी साहित्य आणि स्वच्छता किट्ससह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भूकंपानंतर सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याला हातभार लावण्यासाठी भारताकडून ही मदत पाठवण्यात आली आहे. संकटाच्या या काळात भारत कोलंबियाच्या जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोलंबियाला पाठवण्यात आलेल्या मदतसामग्रीमध्ये जीवनावश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी साहित्य, स्वच्छता साहित्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. भूकंपग्रस्त भागातील तातडीच्या गरजा लक्षात घेऊन ही मदत तयार करण्यात आली आहे.
Dispatched the first tranche of the 20 MT relief supplies to Colombia to support ongoing post-earthquake recovery efforts.
The assistance includes medicines & medical equipment, temporary shelter & hygiene support, and other essential items needed in the aftermath of the… pic.twitter.com/G6eI5qGEf4
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 14, 2026
७.४ तीव्रतेच्या भूकंपाने कोलंबिया हादरले
कोलंबियाला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून, उपलब्ध माहितीनुसार २६५ जणांचा मृत्यू झाला असून ३,४९४ जण जखमी झाले आहेत. हजारो कुटुंबे या आपत्तीमुळे प्रभावित झाली आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांनी भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला गंभीर संकट म्हटले आहे. प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये सार्वजनिक सेवांच्या खर्चासाठी मदत, घरभाडे अनुदान, करसवलत आणि आर्थिक सहाय्याचा समावेश आहे.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर वृद्ध दांपत्याला लुटले
मुंबईत बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ; ५ जणांवर गुन्हे दाखल
नोएडा विमानतळावर पाणी साचलं; YIAPL कडून अहवाल मागवला
अरुणाचलमध्ये चीनचा नवा कब्जा नाही!
या भूकंपामुळे २५,८७२ कुटुंबे अर्थात ५३,८१६ नागरिक प्रभावित झाल्याचे कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे. तसेच ४९६ जण बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे हे सरकारचे सध्या सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
