“भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी तळ म्हणून करतोय” पाक लेफ्टनंट जनरल बरळले

खैबर पख्तूनख्वामधील दहशतवादाच्या वाढीमागील कारणे सांगताना केले वक्तव्य

“भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी तळ म्हणून करतोय” पाक लेफ्टनंट जनरल बरळले

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांची जवळीक पाहता पाकिस्तान अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. अशातच आता पाकिस्तानने भारत विरोधात गरळ ओकण्याची सुरुवात केली आहे. भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादाच्या कारवायांचा तळ म्हणून करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक (DG) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पेशावर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खैबर पख्तूनख्वामधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा देण्याचा प्रयत्न केला. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीतील तणाव हा सर्वोच्च पातळीवर असल्याचे जगजाहीर आहे. अशातच आता पाकिस्तानने भारताबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे.

आयएसपीआरच्या डीजी यांनी बोलताना खैबर पख्तूनख्वामधील दहशतवादाच्या वाढीमागील अनेक घटकांची रूपरेषा सांगितली. द डॉनच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय कृती योजनेची (एनएपी) अंमलबजावणी न करणे आणि दहशतवादाचे राजकारणीकरण या यादीत “भारत अफगाणिस्तानचा वापर पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या कारवायांचा आधार” म्हणून करत आहे, खळबळजनक दावा त्यांनी केला. २०२१ च्या माघारीनंतर अमेरिकन सैन्याने मागे सोडलेल्या शस्त्रांचा संदर्भ देत, त्यांनी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा या संकटालाही खैबर पख्तूनख्वामधील हिंसाचाराच्या घटनांना जबाबदार धरले. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने असेही म्हटले की, पाकिस्तानची फक्त एकच न्याय्य मागणी आहे की त्यांनी त्यांची भूमी गैर-राज्य घटक आणि दहशतवादी गटांना वापरू देऊ नये.

हे ही वाचा :

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थानातील एकाला अटक!

ट्रम्प यांचा चीनला दणका; आयातीवर १०० टक्के अतिरिक्त कर

अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज ब्लॉक का करण्यात आले? कारण आले समोर!

राहुल गांधीही लोकशाहीसाठी लढतात: नोबेल शांतता पुरस्कारावर काँग्रेस नेत्याची पोस्ट!

काबूलमधील शाहिद अब्दुल हक चौकात पाकिस्तानी हवाई हल्ला हा टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूदला संपवण्यासाठी करण्यात आला होता, असे वृत्त आहे. तथापि, नंतर मेहसूदकडून एक ऑडिओ संदेश आला ज्यामध्ये तो सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सभेत कठोर इशारा दिल्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला, ज्यात त्यांनी म्हटले होते की दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या भूभागाचा सतत वापर केल्याबद्दल पाकिस्तानचा संयम संपला आहे.

Exit mobile version