व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना त्यांच्या देशातील लोकशाही हक्कांसाठी आणि तानाशाहीविरोधातील शांततामय संघर्षासाठी यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, भारतातही यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) मारिया मचाडो आणि भारतातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना केली. त्यांनी सूचित केले की, भारतात “संविधान वाचवण्यासाठी” सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात.
मचाडो आणि राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत राजपूत यांनी एक्सवर लिहिले, “यावेळी, संविधानाचे रक्षण केल्याबद्दल व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्याला नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, देशाचे संविधान वाचवण्याच्या लढाईचे नेतृत्व करत आहेत”.
या पोस्टमुळे देशातील राजकीय वातावरणात नवी चर्चा पेटली आहे. भाजप समर्थक आणि इतर टीकाकारांनी यावर उपरोधिक टिप्पण्या करत राजपूत यांच्या विधानावर टीका केली आहे, तर काँग्रेस समर्थकांनी याला राहुल गांधींच्या संघर्षाची आंतरराष्ट्रीय तुलनेत मान्यता मानले आहे.
इस बार का नोबल शांति पुरस्कार वेनेजुएला की विपक्ष की नेता को मिला है संविधान की रक्षा करने के लिये।
हिंदुस्तान 🇮🇳 के विपक्ष के नेता श्री राहुल गांधी देश के संविधान को बचाने की लड़ाई लड रहे है । pic.twitter.com/xcgfkJixlZ— Surendra Rajput (@ssrajputINC) October 10, 2025
हे ही वाचा :
हमासच्या ताब्यात असलेला एकमेव हिंदू!
…म्हणून मुस्लिमांची संख्या वाढतेय!
गाझामध्ये युद्धबंदी लागू, इस्रायली सैन्याची माघार सुरू!
मारिया मचाडो या पाच वेळा लोकसभा खासदार (वेनेजुएलाच्या संसदेत) राहिल्या असून, त्यांनी तानाशाहीविरोधात शांततामय लोकशाही आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि शांततेच्या मार्गाने बदल घडवण्याच्या प्रयत्नांबद्दल देण्यात आला आहे.







