32 C
Mumbai
Wednesday, May 13, 2026
घरराजकारणउदयनिधी स्टालिन यांना पुन्हा सनातनविरोधाचा झटका

उदयनिधी स्टालिन यांना पुन्हा सनातनविरोधाचा झटका

विजय यांनी मात्र गप्प बसणे केले पसंत

Google News Follow

Related

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांच्यामुळे “सनातन धर्म” वाद पुन्हा एकदा तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेत आला आहे. तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या स्टालिन यांनी पुन्हा एकदा सभागृहात “सनातनचा नायनाट केला पाहिजे” असे वक्तव्य केले, ज्यामुळे विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. मात्र सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री विजय यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

“लोकांना विभाजित करणाऱ्या सनातनाचा नायनाट झाला पाहिजे,” असे स्टालिन यांनी २०२६ च्या निवडणुकांनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात म्हटले. याआधीही त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती आणि त्याचे “निर्मूलन” करण्याचे आवाहन केले होते. त्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर अनेक न्यायालयीन खटले दाखल झाले होते.

मात्र यावेळी त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९४ नुसार राज्य विधिमंडळातील सदस्यांना सभागृहात केलेल्या वक्तव्यांबाबत काही विशेषाधिकार आणि संरक्षण मिळते. यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे आणि सभागृहातील वक्तव्यांवर न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण दिले जाते.

अमित मालवीय यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, स्टालिन यांनी सार्वजनिक मंचाऐवजी विधानसभेचा वापर “कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची थट्टा करण्यासाठी” केला.

हे ही वाचा:

बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली

पाकिस्तानच्या नोमान अलीने रचला इतिहास

आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे

नाशिक ते हरियाणा ‘नीट’ पेपरफुटीचे जाळे?

त्यांनी लिहिले, “मागच्या वेळी उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माच्या ‘निर्मूलना’बद्दल बोलले होते, तेव्हा न्यायालयांनी त्याला द्वेषपूर्ण भाषण म्हटले आणि तमिळनाडूच्या जनतेने त्यांच्या पक्षाला सत्तेबाहेर फेकले. यावेळी ते विधिमंडळाच्या विशेषाधिकारांच्या मागे लपले असतील, पण काही मर्यादा ओलांडल्या जाऊ शकत नाहीत.”

तर डीएमकेचाच नाश

भाजपा नेते विनोज सेल्वम यांनीही स्टालिन यांच्यावर टीका करत म्हटले की, “सनातन धर्म नाही तर डीएमकेचाच तमिळनाडूतून नायनाट झाला. तसेच नारायणन तिरुपती यांनी म्हटले की, “तुम्ही सनातन धर्माविरुद्ध बोललात म्हणूनच जनतेने डीएमकेला सत्तेबाहेर फेकले. या संपूर्ण वादात मुख्यमंत्री विजय यांची शांतता देखील चर्चेचा विषय ठरली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा