भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचे भाष्य भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लगावलेला टोला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था मृत झाल्याचा दावा केला होता.
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. तसेच या विकास प्रवासात ब्रिटन भागीदार बनू इच्छित असल्याचे ते म्हणले. केयर स्टारमर म्हणाले की, २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय असलेल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन. २०४७ पर्यंत पूर्णपणे विकसित देश बनवण्याचे विकसित भारताचे स्वप्न आहे. मी इथे असल्यापासून जे काही पाहिले आहे ते मला याचा पूर्ण पुरावा देत आहे की, तुम्ही त्यात यशस्वी होण्याच्या मार्गावर आहात. आम्हाला त्या प्रवासात भागीदार व्हायचे आहे.”
केयर स्टारमर यांचे हे वक्तव्य आणि १०० हून अधिक सीईओ, उद्योजक, विद्यापीठ कुलगुरू आणि सांस्कृतिक नेत्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शिष्टमंडळासह भारतात येण्याचा त्यांचा हा निर्णय हे सूचित करण्यासाठी पुरेसा आहे की त्यांना भारतासोबत सर्वच क्षेत्रात अधिक भागीदारी करण्यास रस आहे. काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था मृत नसल्याचाही हा पुरावा असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा..
देशाची सेवा करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे
बिहारमध्ये एनडीए बनवेल मजबूत सरकार
भारताने रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारताशी असलेल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना, ट्रम्प यांनी भारताला मृत अर्थव्यवस्था असे संबोधले होते. “भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्थांना एकत्रितपणे खाली आणू शकतात, मला फक्त काळजी आहे,” असे ट्रम्प यांनी जुलैमध्ये एका पोस्टमध्ये म्हटले होते. अमेरिकेने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केल्याबद्दल भारताला दंड ठोठावला असून २५% अतिरिक्त शुल्क लादले आणि एकूण शुल्क ५०% केले.
