“भारताचे मॉस्कोसोबतचे ऊर्जा सहकार्य हे…” ट्रम्प यांच्या दाव्यावर रशियाने काय म्हटले?

भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता

“भारताचे मॉस्कोसोबतचे ऊर्जा सहकार्य हे…” ट्रम्प यांच्या दाव्यावर रशियाने काय म्हटले?

Russian President Vladimir Putin shakes hands with India's Prime Minister Narendra Modi ahead of their meeting at Hyderabad House in New Delhi, India, October 5, 2018. REUTERS/Adnan Abidi - RC1C6EC7FD10

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल असे आश्वासन दिल्याचा दावा केला. यानंतर भारताने आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, भारतीय ग्राहकांचे हित हे सर्वोच्च आहे. यानंतर आता भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारताचे मॉस्कोसोबतचे ऊर्जा सहकार्य हे त्यांच्या राष्ट्रीय हितांशी सुसंगत आहे.

भारत रशियन तेल आयात करत राहील का असे विचारले असता, अलिपोव्ह म्हणाले की, हा प्रश्न भारत सरकारसाठी आहे. भारत सरकार प्रथम देशाचे राष्ट्रीय हित लक्षात घेत आहे आणि ऊर्जेतील आमचे सहकार्य हे त्या हितांशी एकसमान आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत रशियाकडून तेल आयात थांबवेल, वॉशिंग्टन बराच काळ यासाठी आग्रही आहे. आता आपण चीनलाही तेच करायला लावणार आहोत. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर जगभरात चर्चा सुरू झाली होती.

हे ही वाचा..

भारतीय ग्राहकांचे हित सर्वोच्च! ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने दिले उत्तर

क्रिप्टो फसवणूक प्रकरणात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलाविरुद्ध शोध वॉरंट

आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल

“पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलेय, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही”

दरम्यान, ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, नवी दिल्लीने पुनरुच्चार केला की भारताचे ऊर्जा निर्णय ग्राहकांच्या हितावर आधारित आहेत आणि स्थिर किंमती , पुरवठा सुरक्षा राखण्यासाठी आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “भारत हा तेल आणि वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे सातत्याने प्राधान्य राहिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे या उद्देशाने निर्देशित आहेत.” त्यात पुढे असेही म्हटले आहे की, स्थिर ऊर्जेच्या किंमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी उद्दिष्ट आहे.

Exit mobile version