सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यूंच्या कार्यक्रमावर इस्लामी दहशतवादी हल्ला; १२ ठार

पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा संशय

सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यूंच्या कार्यक्रमावर इस्लामी दहशतवादी हल्ला; १२ ठार

ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॉन्डी बीचवर रविवारी संध्याकाळी दोन बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. न्यू साउथ वेल्सचे मुख्यमंत्री क्रिस मिन्स यांनी हा हल्ला दहशतवादी घटना असल्याचे घोषित केले आहे.

क्रिस मिन्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘हनुक्का सणाच्या पहिल्या दिवशी आयोजित ज्यू समुदायाच्या कार्यक्रमालाच लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.’

या हल्ल्यात एक दहशतवादी मारला गेला असून एक जखमी झालेला आहे. त्याची ओळख नाविद अक्रम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला आहे. तो पाकिस्तानी असल्याचेही सांगितले जात आहे.

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत याला “दुष्ट यहुदीविरोधी (अँटीसेमिटिक) कृत्य” असे संबोधले.

न्यू साउथ वेल्स पोलिसांनुसार, जखमींमध्ये दोन पोलिस अधिकारी आहेत. पोलिसांनी सांगितले की, एका संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाला असून दुसरा संशयित गंभीर अवस्थेत आहे.

हा गोळीबार संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता समुद्रकिनाऱ्यावरील गर्दीच्या भागात झाला. घटनेनंतर शेकडो नागरिक भीतीने पळताना दिसून आले. एबीसी न्यूजने पडताळणी केलेल्या व्हिडिओमध्ये बॉन्डी बीचच्या उत्तर भागातून लोक पळताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ

भारतीय शेअर बाजाराची आठवड्यात चांगली कामगिरी

मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट

कौशल्य विकास, प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी

“बॉन्डीतील दृश्ये अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहेत,” असे अल्बानीज यांनी निवेदनात म्हटले. “पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी जीव वाचवण्यासाठी काम करत आहेत. या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती माझ्या संवेदना आहेत.”

या हल्ल्याचा तपास अद्याप सुरू आहे.

पोलिसांनी त्यांच्या पहिल्या सोशल मीडिया संदेशात नागरिकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. जे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात आले.

सुमारे ४० मिनिटांनंतर जारी करण्यात आलेल्या पुढील संदेशात पोलिसांनी सांगितले की, “बॉन्डी बीचवर दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत; मात्र पोलिसांची कारवाई अजूनही सुरू आहे आणि नागरिकांनी त्या परिसरात जाणे टाळावे. कृपया पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करा. पोलिसांनी घातलेली नाकेबंदी ओलांडू नका.”

घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा कार्यरत असल्याचे दिसून आले. तसेच अनेक जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेताना पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियन ज्यू असोसिएशनने सांगितले की, हा गोळीबार हनुक्का सणाच्या प्रारंभानिमित्त समुद्रकिनाऱ्यावर आयोजित कार्यक्रमादरम्यान झाला.

“कृपया ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायासाठी प्रार्थना करा,” असे या संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंत्री सुसन ले यांनी निवेदनात सांगितले की, हा गोळीबार म्हणजे “ऑस्ट्रेलियाच्या एका प्रतिष्ठित समुदायाच्या मुळावर घाव घालणारी द्वेषपूर्ण हिंसा” आहे.

“हनुक्का बाय द सी या शांतता आणि भविष्यासाठी आशेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमासाठी ज्यू समुदाय एकत्र आला असताना हा हल्ला झाला,” असे ले यांनी सांगितले. “द्वेषामुळे ही शांततेची आणि आशेची साजरी क्षणात उद्ध्वस्त झाली.”

दरम्यान, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी सिडनीतील या गोळीबाराचा तीव्र निषेध करत, हा ज्यू समुदायावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले.

“या क्षणी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आमच्या ज्यू बांधवांवर अत्यंत क्रूर पद्धतीने दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. बॉन्डी बीचवर हनुक्काचा पहिला दिवा लावण्यासाठी जमलेल्या ज्यू लोकांवर हा घृणास्पद हल्ला करण्यात आला,” असे हर्झोग यांनी सांगितले.

 

Exit mobile version