पाकिस्तानी पत्रकार ताहाने दिल्ली स्फोटाला जबाबदार धरले पाकिस्तानलाच

दाव्याने पाकिस्तानात खळबळ

पाकिस्तानी पत्रकार ताहाने दिल्ली स्फोटाला जबाबदार धरले पाकिस्तानलाच

पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी अलीकडच्या दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटांबाबत केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी या दोन्ही स्फोटांमागे “पाकिस्तान सैन्याचे आत्मघाती बॉम्बर असेट्स असल्याचा आरोप केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू, तर त्याच्या एक दिवस आधी १० नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात किमान १३ लोकांचा मृत्यू झाला.

 

ताहा सिद्दीकी यांचा दावा 

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ताहा सिद्दीकी यांनी लिहिले, “गेल्या २४ तासांत दिल्ली आणि इस्लामाबाद दोन्ही ठिकाणी आत्मघाती हल्ले झाले आहेत — ज्यांना पाकिस्तान सैन्य ‘आपले असेट्स’ म्हणते.” ते पुढे म्हणाले, “दक्षिण आशियात कधीही शांतता येऊ शकत नाही, जोपर्यंत पाकिस्तानचे जनरल इस्लामी दहशतवादाला देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून वापरत आहेत.

ही छोटी पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि शेकडो प्रतिक्रिया वादळी चर्चेत बदलल्या.

ताहा सिद्दीकी कोण आहेत?

ताहा सिद्दीकी हे पाकिस्तानच्या सैन्याविरोधात ठाम भूमिका घेणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात.२०१८ मध्ये इस्लामाबादमध्ये त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर ते पॅरिसमध्ये निर्वासित जीवन जगत आहेत. त्यांनी पाकिस्तानमधील पत्रकारितेवरील निर्बंध आणि जीवितधोक्यांविषयी अनेक लेख लिहिले आहेत. त्यांचा अनुभव आणि धाडसी भूमिकेमुळे त्यांच्या टिप्पण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व दिले जाते.

हे ही वाचा:

भारत–सौदी अरेबियाची भागीदारी विश्वासावर आधारित

दिल्लीत येताच मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस

सेनेने दाखवली तत्परतेची अद्भुत झलक

भारतातील तरुणांची प्रतिभा अमेरिकेला हवीय! ट्रम्प यांचे H-1B व्हिसावर उत्तर

सोशल मीडियावरची प्रतिक्रिया

सिद्दीकी यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटल्या, काहींनी त्यांचे समर्थन करत म्हटले की सुरक्षा यंत्रणा आणि परकीय शक्ती गेली अनेक दशके दहशतवादाला राजकीय साधन म्हणून वापरत आहेत. काहींनी अमेरिका, भारत किंवा सोव्हिएत-अफगाण युद्धासारख्या ऐतिहासिक घटकांना जबाबदार ठरवले. अनेकांनी पाकिस्तानने दहशतवाद्यांवर नियंत्रण आणले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले.

तर काहींनी उलट प्रतिक्रिया देत सिद्दीकींवर अन्यायकारक आरोप केल्याचे सांगितले आणि TTP सारख्या संघटना राज्य नियंत्रणाबाहेर कार्यरत असल्याचे नमूद केले. काही प्रतिक्रियांमध्ये पाकिस्तानमधील राजकीय बदलांची मागणी करण्यात आली, तर काहींनी षड्यंत्र सिद्धांत मांडत एक स्फोट दुसऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी घडवला गेला असा दावा केला.

Exit mobile version