भारतातील १५ शहरांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले! सगळी क्षेपणास्त्रे केली निष्प्रभ

भारताच्या इशाऱ्यानंतरही पाकिस्तानने केला होता लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

भारतातील १५ शहरांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले! सगळी क्षेपणास्त्रे केली निष्प्रभ

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून घेतला. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना उध्वस्त केले. कोणत्याही नागरी संरचनेवर अथवा लष्करी इमारतीवर भारताने हल्ला केला नाही. या कारवाईनंतर ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये, भारताने याचा पुनरुच्चारही केला. भारताने आपल्या कारवाईला केंद्रित, मोजकी आणि संघर्ष न वाढवणारी कारवाई असल्याचे म्हटले. विशेषतः हे नमूद करण्यात आले होते की पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. यानंतर मात्र, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा उघड इशाराही देण्यात आला होता.

भारताने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ७ मे आणि ८ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ल्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले Integrated Counter UAS Grid आणि हवाई संरक्षण प्रणालीने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचा पुरावा म्हणून अनेक ठिकाणांहून मिळालेल्या अवशेषांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

यानंतर दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गुरुवारी सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणा लक्ष्य केल्या. भारताची ही कारवाई त्याच क्षेत्रात आणि त्याच तीव्रतेने करण्यात आली जशी पाकिस्तानने केली होती. माहितीनुसार, लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे.

हेही वाचा..

नियंत्रण रेषेवर पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; पूंछमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू

चकमकीत ८ नक्षलवादी ठार

भारतावरील हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला

मैदानावरचा सिंह आता स्वतःशी झुंजतोय…

पाकिस्तानकडून एलओसीवरील उकसवणाऱ्या गोळीबाराचे प्रमाण वाढले असून, मोर्टार आणि जड तोफखाना वापरून कुपवारा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी या जम्मू-कश्मीरमधील भागांमध्ये हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानी गोळीबारामुळे १६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुले समाविष्ट आहेत. या प्रकरणातही भारताने प्रत्युत्तर देण्यास भाग पडले, जेणेकरून पाकिस्तानकडून सुरू असलेला तोफखाना आणि मोर्टार गोळीबार थांबवता येईल. भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, भारत संघर्ष न वाढवण्याच्या भूमिकेवर ठाम असून पाकिस्तानकडूनही परंतु ही भूमिका पाकिस्तान लष्करानेही घेतली पाहिजे.

Exit mobile version