पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवली मुदत संपलेली पाकिटे

लज्जास्पद कृतीवर सोशल मीडियातून खरडपट्टी

पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवली मुदत संपलेली पाकिटे

पाकिस्तान उच्चायोगाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कोलंबोला जाणाऱ्या मदत पॅकेजेसची मुदत संपलेली असल्याचे दिसून आले. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचे नाक कापले गेले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पूरग्रस्त श्रीलंकेच्या पाठीशी असल्याचे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न लज्जास्पद ठरला आहे. पाकिस्तानच्या या हरकतींमुळे सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे.

पाकिस्तानने पूरग्रस्त श्रीलंकेला मदत करण्यासाठी साहित्य पाठवले आणि हे दाखवण्यासाठी उच्चायुक्तालयाने एक्स वर या मालाचे फोटो पोस्ट केले. यानंतर त्यातील वस्तूंची मुदत संपल्याचे लक्षात येताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक पॅकेजेसवरील लेबल्सवर “EXP: 10/2024” लिहिले होते. यामुळे पाकिस्तानने पूर संकटांशी झुंजणाऱ्या श्रीलंकेला कालबाह्य झालेले उत्पादने पाठवल्याचा आरोप होत आहे.

“सदैव एकत्र! पाकिस्तान आज आणि नेहमीच श्रीलंकेसोबत उभा आहे,” असे उच्चायुक्तालयाने विस्थापित कुटुंबांसाठी मदत साहित्य वितरणाची घोषणा करताना लिहिले आहे. पाकिस्तानच्या या कृतीवर अपलोड केलेल्या फोटोंनी लवकरच पाणी टाकले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी “EXP” अधोरेखित केले, ज्याला एक्सपायरी डेट म्हणतात आणि ऑक्टोबर २०२४ हा एक वर्षापूर्वीचा काळ असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली.

पाकिस्तानने आपत्तीग्रस्तांचा अनादर केल्याचा आरोप टीकाकारांनी केला आहे. काही वापरकर्त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की लेबलची तपासणी न करता सार्वजनिकरित्या छायाचित्रे का पोस्ट केली. शिवाय अशी मदत गरजूंना का पाठवली असे सवालही विचारले जात आहेत. इस्लामाबादने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण यावर दिलेले नाही.

हे ही वाचा:

संचार साथी ऍप अनिवार्य नाही!

नगरपालिका, नगरपरिषदांची मतमोजणी पुढे ढकलली! काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

१९ वर्षीय देवव्रत महेश रेखेने शुक्ल यजुर्वेदाचे केले विक्रमी पठण

तोंडातील फोड ते खवखव घशाची… हमखास उपाय घ्या वेलची!

पाकिस्तानला त्याच्या मालवाहतुकीवरून प्रश्नांचा सामना करावा लागत असताना, चक्रीवादळ दिटवाहनंतर श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात मानवतावादी मोहीम हाती घेतली आहे. चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आला, जीवितहानी झाली आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत, भारताने २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि समुद्री मार्गांनी ५३ टन मदत साहित्य पोहोचवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेतून २००० हून अधिक अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफ पथके दुर्गम भागात शोध आणि बचाव कार्य करत आहेत. १५० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांवर आणि नौदलाच्या जहाजांवर मदत पाठवण्यात आली आहे, ज्यात आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांचा समावेश आहे.

Exit mobile version