दिल्ली, मुंबई, कोलकात्यात बांगलादेशविरोधात संताप

दिपू चंद्र दासच्या घटनेनंतर सर्वत्र आंदोलने

दिल्ली, मुंबई, कोलकात्यात बांगलादेशविरोधात संताप

बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्येच्या  घटनेनंतर नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उसळले. या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल करत असून, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा तसेच धार्मिक स्थळांच्या तोडफोडीचा तीव्र निषेध करण्यात आला.

आंदोलकांनी न्याय आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी करत बांगलादेश सरकारला जबाबदार धरावे, अशी भूमिका घेतली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, तसेच आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स ढकलून दिल्याने तणाव वाढला. आंदोलक “भारत माता की जय”, “युनूस सरकार होश में आओ”, आणि “हिंदू हत्या बंद करो” अशा घोषणा देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी किमान दोन स्तरांचे बॅरिकेड्स तोडले.

हे ही वाचा:

मालवणीतील जमलेले मुस्लीम बंगाली की बांगलादेशी?

चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली–आंध्र प्रदेश सामना प्रेक्षकांविना

दीप्ती नंबर १ गोलंदाज, मंधानाला फटका

कफ सिरपच्या अवैध व्यापार प्रकरणात एसआयटीची कारवाई

एका आंदोलकाने सांगितले, आज आपण आवाज उठवला नाही, तर मीही दीपु ठरेन आणि तुम्हीही दीपु ठराल.

दुसऱ्या आंदोलकाने म्हटले, बांगलादेशात हिंदूंची हत्या होत आहे. ही राम आणि कृष्णांची भूमी आहे. आम्ही कोणालाही मारत नाही, पण तिकडे आमच्या भगिनी आणि मुलींवर अत्याचार होत आहेत.”

अनेक आंदोलक हातात फलक आणि बॅनर घेऊन घोषणा देत होते, ज्यावर दीपु दास यांना न्याय द्या अशी मागणी करण्यात आली होती. काही आंदोलकांनी बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहनही केले.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि परिसरातून त्यांना हटवले. त्यानंतर सुरक्षेची बॅरिकेडिंग पुन्हा उभारण्यात आली.

आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इमारतीभोवती तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था, तसेच पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

बांगलादेशातील दिपू चंद्र दासची निर्घृण हत्या

दीपु चंद्र दास, वय २५, हा एका कपड्यांच्या कारखान्यात काम करणारा युवक होता. १८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यातील बालुका परिसरात कथित धर्मनिंदेच्या आरोपावरून एका जमावाने त्याला लिंच करून ठार मारले, तसेच त्याच्या मृतदेहाला आग लावण्यात आली. या घटनेनंतर देश-विदेशात तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version