भारतीय रिअल इस्टेटमध्ये विक्रमी गुंतवणूक

भारतीय रिअल इस्टेटमध्ये विक्रमी गुंतवणूक

वर्ष २०२५ मध्ये भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणूक विक्रमी ८.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्क्यांनी अधिक आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक पातळी असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या कोलियर्स इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढून ४.८ अब्ज डॉलर्स झाली असून, ती एकूण गुंतवणुकीच्या ५७ टक्के आहे. तर परदेशी गुंतवणूक १६ टक्क्यांनी घटून ३.७ अब्ज डॉलर्सवर आली आहे.

अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, वर्ष २०२५ च्या शेवटच्या तिमाहीत परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीत वाढीचे संकेत मिळाले असून, हे जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासात हळूहळू होत असलेल्या बदलाचे द्योतक आहे. अहवालानुसार, अंतिम तिमाहीत गुंतवणूक ४.२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली, जी एका तिमाहीतील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, हा विक्रमी गुंतवणूक प्रवाह अशा काळात आला आहे, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था तुलनेने स्थिर असून व्यापाराशी संबंधित परिस्थितीही हळूहळू सामान्य होत आहे.

हेही वाचा..

फाल्कन ग्रुपच्या एमडीला अटक

बलुचिस्तानमध्ये आयईडी स्फोट

ट्रंप यांच्या वक्तव्यावर अमेरिकी गायिका मिलबेन काय म्हणाल्या ?

जपानच्या शिमानेमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप

कोलियर्स इंडिया चे नॅशनल डायरेक्टर आणि रिसर्च प्रमुख विमल नादर यांनी सांगितले की, या वाढीसोबतच यंदा कार्यालय क्षेत्रावर केंद्रित चौथा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) सूचीबद्ध झाला. याशिवाय, जुन्या REITs कडून अनेक महत्त्वपूर्ण अधिग्रहणे करण्यात आली. या व्यवहारांमध्ये उच्च दर्जाचे भाडेकरू, अधिक व्यापलेली मालमत्ता आणि भाड्यात मजबूत वाढ दिसून आली. विमल नादर यांनी पुढे अंदाज व्यक्त केला की, येत्या काही वर्षांत परदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्यास या क्षेत्रातील संस्थात्मक रचना आणखी मजबूत होईल. त्यांनी सांगितले की, देशात सुमारे ३७ कोटी चौरस फूट ऑफिस स्पेस भविष्यात REIT अंतर्गत आणता येऊ शकते.

वर्ष २०२५ मध्ये ऑफिस सेक्टरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली. या क्षेत्रात सुमारे ४.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून ती एकूण गुंतवणुकीच्या ५४ टक्के आहे. जी वर्ष २०२४ च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. बेंगळुरू आणि मुंबई यांनी मिळून वर्ष २०२५ मध्ये सुमारे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित केली, जी एकूण रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या सुमारे निम्मी आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतेक गुंतवणूक कार्यालयीन इमारतींमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, भारतातील सात मोठ्या शहरांपैकी पाच शहरांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक नोंदवली गेली आहे. यावरून देशाच्या रिअल इस्टेट बाजारात मजबुती येत असल्याचे स्पष्ट होते.

Exit mobile version