जम्मू काश्मीरमधील शाळेला ‘त्या’ शिक्षिकेचं नाव

जम्मू काश्मीरमधील शाळेला ‘त्या’ शिक्षिकेचं नाव

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये रजनी बाला या शाळेच्या शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कुलगामच्या गोपालपोरा येथील सरकारी हायस्कूलला रजनी बाला यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा बुधवारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी रजनी बाला यांच्या घरी पोहोचले होते. रजनी बाला यांच्या कुटुंबीयांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील,असे त्यांननी त्यावेळी सांगितले आहे. याशिवाय त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असंही त्यांनी सांगितले आहे. ३१ मे रोजी रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी

मलिकांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली

राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

रजनी बाला यांची गोपाळपूर हायस्कूलबाहेर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्या मूळच्या जम्मूमधील सांबा येथील असून कुलगाम येथील शाळेत ती शिकवत होती. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील वडगाम येथील सरकारी कार्यालयात घुसून लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची गोळ्या घालून हत्या केली होती. स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या रोजगारासाठी देण्यात आलेल्या विशेष पॅकेज अंतर्गत ३५ वर्षीय राहुल चदूराची तहसील कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. राहुलच्या आधीही माखन लाल बिंद्रू या ड्रग डीलरची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

Exit mobile version