29 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरराजकारणराज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

Related

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही लढत चुरशीची ठरत आहे. मात्र या दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री राष्ट्रवादीचा ४२ मतांचा कोटा अचानक ४४ केल्याचे वृत्त आहे. तसेच काँग्रेसनेही मतांचा कोटा वाढवल्याची माहिती ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

शरद पवार यांनी रात्री अचानक गणित फिरवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचा ४२ मतांचा कोटा शरद पवारांनी अचानक ४४ चा केला. यामुळे शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्याने आता महाविकास आघाडीची चौथ्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठीच मतांचा कोटा ऐनवेळी बदलण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली होती. विशेष न्यायालयाने त्यांना मतदानास नकार दिल्यानंतर आता समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे शरद पवारांनी तातडीने निर्णय घेतला. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला एकूण ४२ मतं लागणार आहेत. ४२ मतांचा कोटा ठरलेला असताना, राष्ट्रवादीने तो ४४ केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली

सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी

राष्ट्रवादीने कोटा वाढवताच काँग्रेसनेही कोटा वाढवल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संजय पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, या पेरलेल्या बातम्या असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत, आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडणून येतील असे शिवसेना आमदारांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,921अनुयायीअनुकरण करा
10,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा