28 C
Mumbai
Wednesday, June 29, 2022
घरक्राईमनामाचिथावणीखोर वक्तव्यानंतर ओवेसी यांच्यासह ३१ जणांवर गुन्हा दाखल

चिथावणीखोर वक्तव्यानंतर ओवेसी यांच्यासह ३१ जणांवर गुन्हा दाखल

Related

दिल्ली पोलिसांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ओवेसी यांच्यासह किमान ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अलीकडेच नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांवर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. याचे पडसाद देशात आणि काही अरब देशांमध्येही उमटले होते. या वादानंतर दिल्ली पोलिसांनी द्वेष पसरवणाऱ्या, विविध समुदायांना भडकावणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नुपूर शर्मा आणि भाजपचे माजी नेते नवीन जिंदाल यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्यानंतर अनेक आखाती देशांनी निषेध केला होता. त्यानंतर भाजपने दोन्ही नेत्यांना निलंबित केले. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो आणि त्यामुळेच या नेत्यांवर पंथ किंवा धर्माचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली

शादाब चौहान, सबा नक्वी, हाफिझुल हसन अन्सारी, बिहारी लाल यादव, इलियास सरफुद्दीन, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, आर विक्रमन, नगमा शेख, डॉ मोहम्मद कलीम तुर्क, अतीउर रहमान खान, सुजा अहमद, विनीता शर्मा, इम्तियाज अहमद, असदुद्दीन ओवेसी, कुमार दिवाशंकर, दानिश कुरेशी, मोहम्मद साजिद शाहीन, क्यू सेन्सी, गुलजार अन्सारी, सैफद्दीन कुतुज यांची नावे एफआयआरमध्ये आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,941चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
11,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा