30 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरक्राईमनामाकांदिवलीत एटीएम व्हॅनवर डल्ला मारणाऱ्यांना पाठलाग करत केले जेरबंद

कांदिवलीत एटीएम व्हॅनवर डल्ला मारणाऱ्यांना पाठलाग करत केले जेरबंद

६३ लाखांची लूट, मुंबई गोवा हायवेवर थरार

Google News Follow

Related

कांदिवली पश्चिम परिसरात एटीएम कॅश व्हॅनमधून ६३ लाख १३ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात कांदिवली पोलिसांना अवघ्या सहा तासांत यश आले आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच सुरक्षा रक्षकाला गुंगारा देऊन ही चोरी केली होती. पोलिसांनी मुंबई-गोवा हायवेवर सापळा रचून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली असून, त्यांच्याकडून ६२ लाख ७४ हजार १०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सुशांत कासारे (३२) आणि सुफियान रज्जब अली (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी रात्री ९:४० च्या सुमारास ‘सीएसएम इन्फोसिस लिमिटेड’ कंपनीची कॅश व्हॅन कांदिवलीतील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आली होती. यावेळी व्हॅनमध्ये असलेला कंपनीचा कर्मचारी सुशांत कासारे याने सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना बोलण्यात गुंतवले. संधी मिळताच त्याने व्हनमधील रोकड असलेल्या दोन बॅगा लंपास केल्या आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून पळ काढला.

हे ही वाचा:

“इराणऐवजी इटलीला घ्या!” – वर्ल्ड कपवर ट्रम्पचा दबाव

मी तिकीट काढून फक्त सचिनसाठी बसेन!

“ही काय फलंदाजी?” पंतवर बांगरचे ताशेरे

आत्महत्या रोखण्यासाठी संशयित आरोपी आता नव्या गणवेशात

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी कारमधून पळाल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी रायगडच्या दिशेने मुंबई-गोवा हायवेवरून जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत मगर आणि त्यांच्या पथकाने तात्काळ आरोपीचा पाठलाग सुरू केला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बाभळी-नागोठणे परिसरात पोलिसांनी या कारला घेराव घातला आणि मुख्य आरोपी सुशांत कासारेला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता चोरलेली बहुतांश रोकड हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्यात कार पुरवणारा त्याचा साथीदार सुफियान अली यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

“आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली होती, मात्र तांत्रिक तपासाच्या जोरावर आम्ही ६ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावला आहे. चोरीचा उर्वरित तपास आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.” – संदीप जाधव, पोलीस उपायुक्त

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा