30 C
Mumbai
Saturday, April 25, 2026
घरस्पोर्ट्स“इराणऐवजी इटलीला घ्या!” – वर्ल्ड कपवर ट्रम्पचा दबाव

“इराणऐवजी इटलीला घ्या!” – वर्ल्ड कपवर ट्रम्पचा दबाव

Google News Follow

Related

फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच वादाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दूताने फिफाकडे इराणऐवजी इटलीला स्पर्धेत स्थान देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

ही मागणी ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर केल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांचे विशेष दूत पाओलो झॅम्पोली यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांना हा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. “चार वेळा विश्वविजेते असलेल्या इटलीसारख्या संघाला स्पर्धेत पाहणे योग्य ठरेल,” असे त्यांनी म्हटल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, इटलीला सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरता आलेले नाही. प्ले-ऑफमध्ये बोस्निया आणि हर्जेगोविनाकडून पराभव झाल्याने त्यांचे स्वप्न भंगले. विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच एखादा माजी विजेता संघ सलग तीन वेळा पात्र ठरू शकला नाही.

दुसरीकडे, इराणने सलग चौथ्यांदा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांनी आपले सामने अमेरिकेऐवजी मेक्सिकोमध्ये हलवण्याची विनंती केली आहे. इराणचे क्रीडामंत्री अहमद डोनयामाली यांनी देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये ट्रम्प यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत इराणच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “इराण संघाचे स्वागत आहे, पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य ठरेल का, याबद्दल शंका आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

११ जून ते १९ जुलैदरम्यान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होणाऱ्या या विश्वचषकापूर्वीच निर्माण झालेल्या या वादामुळे क्रीडा आणि राजकारण पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा