इराणच्या धमकीमुळे ट्रम्प यांची पळापळ, विमानच बदलले!

तुर्कीहून ब्रिटनला जाण्यासाठी जुन्या एअर फोर्स वनचा वापर

इराणच्या धमकीमुळे ट्रम्प यांची पळापळ, विमानच बदलले!

इराणकडून निर्माण झालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीहून ब्रिटनला अत्यंत गुप्त पद्धतीने प्रवास केला. अंकारामध्ये नाटो परिषदेसाठी गेलेल्या ट्रम्प यांना विमानतळावरील केटरिंग ट्रकमधून दुसऱ्या लष्करी विमानात हलवण्यात आले. या संपूर्ण हालचालीदरम्यान पत्रकार आणि व्हाइट हाऊसचे कर्मचारी ट्रम्प जुन्या एअर फोर्स वन विमानातूनच प्रवास करत असल्याच्या समजुतीत होते.

ट्रम्प नाटो परिषदेसाठी कतारकडून मिळालेल्या नव्या विमानातून अंकाराला पोहोचले होते. मात्र, तुर्कीहून परतताना त्यांनी त्या विमानाऐवजी जुन्या एअर फोर्स वनचा वापर केला. नव्या विमानाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

अंकारा विमानतळावर ट्रम्प जुन्या एअर फोर्स वनमध्ये चढले. त्यानंतर काही वेळातच त्यांना विमानतळावरील केटरिंग ट्रकच्या माध्यमातून एअर फोर्स सी-३२ए या छोट्या विमानात गुप्तपणे नेण्यात आले. हे विमान ब्रिटनच्या दिशेने रवाना झाले. सी-३२ए विमान ब्रिटनमध्ये रात्री सुमारे १०.२० वाजता पोहोचले. त्यानंतर जुन्या एअर फोर्स वनमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी असलेले विमान काही मिनिटांनी तेथे दाखल झाले.

ट्रम्प यांनी यापूर्वी सोशल मीडिया पोस्टमध्ये अंकाराहून ब्रिटनमधील आरएएफ मिल्डेनहॉल येथे जाण्यासाठी जुन्या, निळ्या रंगाच्या एअर फोर्स वनचा वापर करणार असल्याचे म्हटले होते. नव्या विमानाला त्याच तळावर थांबवण्यात येणार असून, तेथे तैनात अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांना विमानाची पाहणी करता यावी, असेही सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

धारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

अमुलच्या बनावट दुध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

उत्तराखंडमध्ये ढगफुटीसह मुसळधार पावसाचा कहर; पूल गेला वाहून

गुप्त प्रवासाबाबत व्हाइट हाऊसकडे प्रतिक्रिया विचारण्यात आली असता, कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीव्ह च्युंग यांनी नव्या कतारी विमानात राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आल्याचे सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अनेक शत्रूंकडून धोका असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले असून, अशा धोक्यांचा सामना करण्यासाठी उपलब्ध प्रत्येक साधनाचा वापर केला जात असल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले.

Exit mobile version