27.3 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरदेश दुनियाब्रिटिश स्पाय ड्रोनमधून चीनला सिग्नल? सुरक्षा तपासणीत धक्कादायक कनेक्शन उघड

ब्रिटिश स्पाय ड्रोनमधून चीनला सिग्नल? सुरक्षा तपासणीत धक्कादायक कनेक्शन उघड

ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ

Google News Follow

Related

ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या विशेष दलांकडून वापरल्या जाणाऱ्या पाळत ठेवणाऱ्या ड्रोनमधून चीनमधील एका आयपी अ‍ॅड्रेसवर डेटा पाठवला जात असल्याचे समोर आले आहे. नियमित सायबर सुरक्षा तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ब्रिटनच्या संवेदनशील लष्करी उपकरणांमध्ये चिनी बनावटीच्या घटकांच्या वापराबाबत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या ड्रोनना के-३ स्काउट मानवरहित यंत्रणा म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश संरक्षण क्षेत्रातील कंपनी क्रॅकेन टेक्नॉलॉजी ग्रुपने त्यांचा पुरवठा केला असून, रॉयल मरीनसाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे १२ दशलक्ष पौंडांच्या ताफ्याचा हे ड्रोन भाग आहेत. मार्चपासून त्यांचा वापर सुरू झाला होता. सायबर व्हल्नरेबिलिटी असेसमेंटदरम्यान तपास अधिकाऱ्यांना ड्रोनवरील कॅमेऱ्यांमध्ये चीनमध्ये तयार करण्यात आलेले काही घटक आढळले. हे कॅमेरे चीनमधील एका आयपी अ‍ॅड्रेसला नियमितपणे ‘हार्टबीट कम्युनिकेशन’ पाठवत असल्याचे आढळले. ‘हार्टबीट कम्युनिकेशन’ म्हणजे एखादे उपकरण इंटरनेटशी जोडलेले आणि कार्यरत असल्याची माहिती देणारे मूलभूत सिग्नल. मात्र, लष्करी ड्रोनमध्ये अशा प्रकारचे संप्रेषण चीनमधील आयपी अ‍ॅड्रेसकडे जात असल्याचे समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली.

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने (MoD) या कॅमेऱ्यांचे इंटरनेट कनेक्शन काढून टाकले. मंत्रालयाच्या तपासणीत संवेदनशील माहिती किंवा संरक्षण मंत्रालयाच्या यंत्रणांपर्यंत अनधिकृत प्रवेश झाल्याचे पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कोणतीही संवेदनशील माहिती ब्रिटनबाहेर पाठवली गेल्याचेही आढळले नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

सोन्याच्या दरात मोठी झेप; २४ कॅरेट सोने ₹१.५५ लाखांवर

मिल्की मिस्टचा ₹१,५५३ कोटींचा आयपीओ खुला

भारतीयांच्या गृहकर्जाच्या मागणीत मोठी वाढ

स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी

या ड्रोनचा वापर डॉर्सेटमधील पूल येथे स्पेशल बोट सर्व्हिसच्या (SBS) मुख्यालयाजवळ करण्यात आला होता. त्यामुळे या उपकरणांमुळे संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ड्रोन बंद केलेले असतानाही त्यावरील कॅमेरे सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच वरिष्ठ विशेष दलाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकींच्या परिसरातही ही उपकरणे उपस्थित होती. ब्रिटिश संरक्षण व्यवस्थेसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ठिकाणांजवळ वापरल्या गेलेल्या या ड्रोनमधून चीनमधील आयपी अ‍ॅड्रेसशी संपर्क होत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा