इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सामील होणार?, ट्रम्प दोन आठवड्यात घेणार निर्णय!

व्हाईट हाऊसने दिली माहिती

इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सामील होणार?, ट्रम्प दोन आठवड्यात घेणार निर्णय!

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अजूनही सुरु आहे. दोनही बाजूने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरूच आहेत. या युद्धात अनेकांचे बळी गेले आहेत, तर बरेच जण जखमी झाले आहेत. दोनही देशांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र त्यांनी नकार दिला आहे. अमेरिकेने इराणला आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. परंतु, इराणने नकार देत इशारा दिला कि अन्य देश या युद्धात सहभागी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याच दरम्यान, या युद्धात अमेरिका सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान, व्हाईट हाऊसने मोठी माहिती दिली आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या सहभागाबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यांत निर्णय घेतील, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ही माहिती दिली. कॅरोलिन लेविट म्हणाल्या, इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सहभागी होईल की नाही हे अध्यक्ष ट्रम्प पुढील दोन आठवड्यात ठरवतील. ट्रम्प यांच्या संदेशाचा हवाला देत लेविट यांनी पत्रकारांना सांगितले की, “नजीकच्या भविष्यात इराणशी वाटाघाटी होतील किंवा होणार नाहीत, याची वाजवी शक्यता असल्याने, मी पुढील दोन आठवड्यात माझा निर्णय घेईन.”

हे ही वाचा : 

तेलंगणात १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!

पंतप्रधान मोदी दोन दिवसांत तीन राज्यांचा करणार दौरा! 

पाकिस्तानची नवी कबुली; सौदी राजपुत्राने सांगितले, भारताला युद्ध थांबवण्याची विनंती करा!

नाबर गुरुजी शाळा बंद पडली, राज ठाकरेंनी काय केले ?

दरम्यान, गुरुवारी (१९ जून) सकाळी सोरोका मेडिकल सेंटरवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची धमकी दिली आहे. इस्रायलने माहिती दिली आहे की इराणच्या हल्ल्यानंतर २७१ लोक रुग्णालयात दाखल झाले, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर होती. खामेनींना मारण्याची धमकी देत ​​इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की, ‘हा माणूस जिवंत राहिला नाही पाहिजे.’

Exit mobile version