भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नूर खान आणि शोरकोट एअरबेसवर हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीच आता दिली आहे. शिवाय, भारताशी ताबडतोब संपर्क साधून हे थांबवा अशी विनंती करण्यास सौदी अरेबियाने सांगितल्याचेही दार म्हणाले.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी कबुली दिली की, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नूर खान एअरबेस (रावळपिंडी) आणि शोरकोट एअरबेसवर ७ मे रोजी हल्ला केला. या कारवाईपूर्वी २६ नागरिकांची हत्या पहलगाममध्ये झाली होती आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
हे ही वाचा:
साठ्ये कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, घातपात असल्याचा दावा
ओसामा विसरलात का?” शशी थरूर यांचा डोनाल्ड ट्रम्पना टोमणा
आसाममध्ये लव्ह जिहाद, हिंदू तरुणीने केली आत्महत्या!
दार यांचे हे वक्तव्य भारताच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत पाकिस्तान सरकार आणि लष्कराने वारंवार नकार दिल्यानंतर आले. Geo News वर दिलेल्या मुलाखतीत दार यांनी उघड केले की, भारताने जेव्हा हल्ला केला तेव्हा पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करत होता, पण भारताच्या वेगवान कारवाईने त्यांना गाफील केले.
भारताची कारवाई मोजकी, अचूक होती आणि युद्धाला उत्तेजन देणारी नव्हती, हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने कारवाई केली. भारताच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा आणि भारतावर हल्ला करणाऱ्या यंत्रणांवर केंद्रित होती.
सौदी अरेबियाचा हस्तक्षेप
दार यांनी पुढे सांगितले की, भारताच्या हल्ल्यानंतर केवळ ४५ मिनिटांत सौदी प्रिन्स फैसल बिन सलमान यांनी त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला. “प्रिन्स फैसल यांनी मला विचारले की, मी जयशंकरांना सांगू शकतो का की पाकिस्तान आता थांबण्यास तयार आहे,” असे दार यांनी Geo News ला सांगितले. प्रिन्स फैसल भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी पाकिस्तानच्या वतीने संपर्क साधू इच्छित होते.
या घटनेतून स्पष्ट होते की रियाधने या तणावपूर्ण प्रसंगात शांतता राखण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली. दार यांनी हेही उघड केले की पाकिस्तानने भारताच्या पुढील कारवायांना रोखण्यासाठी अमेरिकेशीही संपर्क साधला होता.
शरीफ आणि पाकिस्तान लष्कराची पूर्वीची विधाने फोल
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी भारताला “जोरदार उत्तर” दिल्याचा दावा केला होता. पण नंतर शरीफ यांनी स्वतः मान्य केले आहे की भारताने रावळपिंडी विमानतळासह अनेक ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.
“भारताने पुन्हा ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून रावळपिंडी विमानतळासह पाकिस्तानच्या विविध प्रांतांवर हल्ला केला,” असे शरीफ यांनी अलीकडील एका मुलाखतीत सांगितले.
शरीफ यांनी असेही सांगितले की पाकिस्तानने १० मे रोजी सकाळी ४:३० वाजता प्रतिहल्ला करण्याचे नियोजन केले होते, पण भारताच्या ९-१० मेच्या रात्री दुसऱ्या टप्प्यातील कारवाईने ते नियोजन उधळले. यामुळे हे स्पष्ट होते की भारताने केवळ आधी हल्ला केला नाही, तर पाकिस्तानचा प्रतिहल्लाही उधळून लावला.
भारतीय कारवाईमुळे ‘न्यू नॉर्मल’
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख आणि सध्या फील्ड मार्शल असलेले जनरल असीम मुनीर यांनी म्हटले होते की, भारताच्या कृतीमागे “न्यू नॉर्मल” तयार करण्याचा प्रयत्न होता.
