आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुस्लीम तरुणाच्या त्रासाला कंटाळून हिंदू तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी साहिल अहमदला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
लव्हजिहादची बळी ठरलेली हिंदू तरुणी श्रीभूमी शहरातील रेड क्रॉस रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. साहिल अहमद नावाच्या एका मुस्लिम तरुणाने तिच्याशी मैत्री केली, यावेळी त्याने आपले नाव ‘राजू’ असे सांगितले. मैत्रीनंतर त्याने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि बराच काळ तिचे शोषण केले.
जेव्हा मुलीला त्याची खरी ओळख कळली तेव्हा तिने त्याच्याशी संबंध तोडले. पण, आरोपी साहिल अहमदने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सर्व जाचाला कंटाळून तरुणीने काल (१८ जून) आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतापलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई करत आहेत.
हे ही वाचा :
तन-मनासाठी वरदान ठरणारा सूर्यनमस्कार
२० जून : ईराणच्या इतिहासातील ‘वेदनादायक’ दिवस
लवकरच इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल!
मुंबई विमानतळावर २५ कोटींचा गांजासह गुजरातच्या दाम्पत्याला अटक
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. एक महिन्यापूर्वी मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली होती. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने आरोपी आमिर, सुहेल, शोएब आणि साकिबविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे कंटाळून पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली.
News coming in from #Sribhumi district of #Assam.
A Hindu girl, a victim of #LoveJihad died by suicide on 18.06.2025.
A Muslim youth named Sahil Ahmed trapped the Hindu girl in Love by concealing his Muslim name and identity. Sahil Ahmed used the name ‘Raju’. When the girl… pic.twitter.com/7xfduJ2i7f
— Hindu Voice (@HinduVoice_in) June 19, 2025
