देशात सुरू असलेल्या भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नव्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना, त्यांनी म्हटले की, देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटू लागेल, कारण भारतीय भाषांना अधिक महत्त्व मिळेल.
“या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल – असा समाज घडण्यास फार वेळ लागणार नाही. मला वाटते की आपल्या देशातील भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भाषांशिवाय आपण खऱ्या अर्थाने भारतीय राहू शकत नाही,” असे शहा यांनी ठासून सांगितले.
इंग्रजी हे गुलामीचे प्रतीक
शहा यांनी भारतीय भाषांचा वारसा पुनःप्राप्त करण्यासाठी देशभरात प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन केले. त्यांनी भविष्यवाणी केली की, इंग्रजी ही गुलामगिरीचं प्रतीक मानली जाईल आणि जगभरात तिला कमी लेखलं जाईल. आपल्या देशाला, संस्कृतीला, इतिहासाला आणि धर्माला समजून घेण्यासाठी कोणतीही विदेशी भाषा पुरेशी नाही. अर्धवट विदेशी भाषांमधून पूर्ण भारताची कल्पना करता येणार नाही,” असेही ते म्हणाले.
“मला पूर्ण भान आहे की ही लढाई कठीण आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकणारच. पुन्हा एकदा, आत्मसन्मानासह आपल्या भाषांमध्ये आपण देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू” असे शहा यांनी ठामपणे सांगितले.
हे ही वाचा:
तेजस्वी यादव बिहारला जंगलराजाकडे नेऊ इच्छितात
मुंबई विमानतळावर २५ कोटींचा गांजासह गुजरातच्या दाम्पत्याला अटक
उत्तर २४ परगण्यात ईडीचा व्यावसायिकाच्या घरी छापा
हसन यांना योगामध्येही हिंदू-मुस्लिम दिसते
भाषावाद आणि ‘हिंदी लादणे’
दक्षिण भारतातील काही राज्ये आणि विरोधक सत्तेत असलेल्या राज्यांनी केंद्रावर हिंदी लादण्याचा आरोप केला आहे. विशेषतः, नवीन शैक्षणिक धोरणातील (NEP) तीन-भाषा सूत्र या मुद्यावरून वाद पेटलेला आहे. तामिळनाडूने केंद्रावर टीका करताना म्हटले आहे की, भाजपा शिक्षण सुधारणेच्या नावाखाली हिंदी गुपचूप लादण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालसह इतर राज्यांनीही यावर भाजपला लक्ष्य केलं आहे.
गृहमंत्रालयाचा नवीन निर्णय
या पार्श्वभूमीवर, शहा यांनी यावर्षी जाहीर केले की डिसेंबरपासून गृहमंत्रालय राज्यांशी त्यांच्या स्थानिक भाषांमध्येच संवाद साधेल. त्यांनी सांगितले की, भाषेवरून देशात खूप फूट निर्माण झाली आहे, आणि आता ती पुन्हा होऊ नये.
