30.5 C
Mumbai
Thursday, June 11, 2026
घरक्राईमनामा'मिस केरळ हर्षा सनी'ने बँकॉकहून आणले ११ कोटींचे अमली पदार्थ ?

‘मिस केरळ हर्षा सनी’ने बँकॉकहून आणले ११ कोटींचे अमली पदार्थ ?

मुंबई विमानतळावर हायड्रोपोनिक गांजासह अटकेत

Google News Follow

Related

मिस केरळ म्हणून ओळखली जाणारी हर्षा सनी (वय २८) हिला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल ११.८२४ किलो हायड्रोपोनिक गांजासह कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) अटक केली आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या तिच्या सामानातून सुमारे ११ कोटी ८२ लाख ४० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या वकिलांनी मात्र तिची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे.

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीआयएस (Advanced Passenger Information System) प्रोफाइलिंगच्या आधारे हर्षा सनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिची तपासणी करण्यात आली. ११ जून रोजी पहाटे मुंबई विमानतळावर तिची चौकशी करण्यात आली. तिच्या वैयक्तिक झडतीदरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. मात्र, तिच्या चेक-इन ट्रॉली बॅगेची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये १२ व्हॅक्यूम सीलबंद पॅकेट्स सापडली.

या पॅकेट्समध्ये हिरव्या रंगाचा संशयास्पद पदार्थ आढळून आला. एनडीपीएस किटच्या साहाय्याने करण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीत तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या वजनात या अमली पदार्थाचे एकूण वजन ११  हजार ८२४ ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ११.८२ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पाच वर्षांनंतर कळले फोंडा घाटात झालेला तो ‘अपघात’ नव्हता तर होता खून

तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी

आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा

पश्चिम आशियातील तणावामुळे शेअर बाजारात अस्थिरता

याप्रकरणी हर्षा सनीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून अमली पदार्थ तस्करीमागील आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेतला जात आहे. तसेच हर्षा सनीची नेमकी भूमिका, तिचे संपर्क आणि बँकॉकमधील हालचालींचाही तपास सुरू असल्याची माहिती कस्टम विभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी तिच्या बचावासाठी वेगळी भूमिका मांडली आहे. हर्षा सनी ही बँकॉकला पर्यटनासाठी गेली होती. त्याचबरोबर नेल-आर्ट आणि मॉडेलिंग क्षेत्रातील व्यावसायिक संधींचाही ती शोध घेत होती. प्रवासादरम्यान तिची एका व्यक्तीशी ओळख झाली आणि त्या व्यक्तीने तिचा विश्वास संपादन करून भारतात एक बॅग आणण्यास तिला तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

“आमच्या अशिलाचे सुरुवातीपासून एकच म्हणणे आहे की, त्या बॅगेत कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर किंवा अमली पदार्थ असल्याची तिला माहिती नव्हती. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सर्व तथ्ये समोर येण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढू नये,” असे आरोपीचे वकील ऍड. प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा