भारतावरील निर्बंधांनंतर ट्रम्प यांचा परराष्ट्र धोरणाबद्दलचा सदोष दृष्टिकोन दिसतो!

अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडून टीका

भारतावरील निर्बंधांनंतर ट्रम्प यांचा परराष्ट्र धोरणाबद्दलचा सदोष दृष्टिकोन दिसतो!

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर निर्बंध लादण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयामुळे मोठे धोरणात्मक चित्र गमावल्याचे बोल्टन यांनी म्हटले. तसेच या निर्बंधांमुळे ट्रम्प यांचा परराष्ट्र धोरणाबद्दलचा सदोष दृष्टिकोन दिसून येतो, असे म्हणत त्यांनी टीकास्त्र डागले.

एका कार्यक्रमात बोलताना जॉन बोल्टन म्हणाले की, भारतावर निर्बंध लादून ट्रम्प यांनी एक मोठे धोरणात्मक चित्र गमावले आहे. त्यांनी थेट रशियावर निर्बंध लादले नाहीत किंवा चीनच्या मागे ते गेले नाहीत जो खरे तर भारतापेक्षा जास्त रशियन तेल खरेदी करतो, असे बोल्टन म्हणाले. पुढे त्यांनी असा युक्तिवाद केला की, ट्रम्प यांचा व्यापार चर्चेचा ध्यास अनेकदा व्यापक रणनीतीच्या खर्चावर आला. ट्रम्प फक्त व्यापाराबद्दल बोलू इच्छित होते आणि मोठे धोरणात्मक चित्र गमावले. त्यांनी रशियावर निर्बंध लादले नाहीत, परंतु त्यांनी भारतावर निर्बंध लादले. त्यांनी चीनवर निर्बंध लादले नाहीत, ज्याची भारतापेक्षा तेल आणि वायूची खरेदी लक्षणीयरीत्या जास्त आहे.

ट्रम्प यांच्याविरुद्ध बोलण्याची बोल्टन यांची ही पहिलीच वेळ नसून त्यांनी यापूर्वी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील एकेकाळी जवळचे वैयक्तिक नाते आता नाहीसे झाले आहे. “ट्रम्प यांचे मोदींशी वैयक्तिकरित्या खूप चांगले संबंध होते. मला वाटते की ते आता कमी झाले आहे आणि हा सर्वांसाठी एक धडा आहे.”

हे ही वाचा:

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी महोत्सव आयोजकासह गर्ग यांच्या व्यवस्थापकाला अटक

फिलीपिन्समध्ये ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप; ३१ जणांचा मृत्यू

लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी दक्षिण अमेरिकेत दाखल

बरेलीमध्ये मौलाना मोहसीन रझा यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई!

बोल्टन यांचे हे विधान भारत- अमेरिका संबंधांमधील तणावपूर्ण क्षणी आले आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादला आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग हे बीजिंगमध्ये एकत्र दिसल्यानंतर साऱ्या जगाचे लक्ष या भेटीकडे लागून होते.

Exit mobile version