संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी जागतिक शांतता, न्याय आणि समान संधीचे आवाहन केले. तसेच त्यांनी इशारा दिला की वंशवाद, द्वेष, दडपशाही आणि वर्णभेदाने प्रेरित मानवी मूर्खपणा हा आपल्या भविष्याला धोका निर्माण करतो. विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या १९ मिनिटांच्या भाषणाचा समारोप “ओम शांती, शांती ओम” या संस्कृत मंत्राने केला.
सुबियांतो यांनी जाहीर केले की, इंडोनेशिया गाझा किंवा पॅलेस्टाईनमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमच्या २०,००० किंवा त्याहून अधिक मुला-मुलींना तैनात करण्यास तयार आहे. इंडोनेशिया संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सर्वात जास्त योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे. जिथे शांतता राखण्यासाठी रक्षकांची गरज आहे तिथे आम्ही फक्त शब्दांनी नव्हे तर जमिनीवर बूट घालून सेवा देत राहू, असे त्यांनी अधोरेखित केले.
हे ही वाचा :
नेपाळमधील हिंसाचारात माजी पंतप्रधानांच्या पत्नी गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी भारतात हलवले!
कुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?
स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला की “हे” काम करा!
या विरोधकांपेक्षा अभिषेक शर्मा बरा!
सुबियांतो यांनी दोन-राज्य उपायासाठी इंडोनेशियाच्या पूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. पॅलेस्टाईन आणि इस्रायल दोघांनाही दहशतवादापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. गाझामधील परिस्थितीबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, जिथे निर्दोष लोक मदतीसाठी ओरडत आहेत, तेव्हा राष्ट्रांच्या या समुदायाने ही आपत्ती थांबवण्यासाठी निर्णायक भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा जग कधीही न संपणाऱ्या युद्धांच्या आणि वाढत्या हिंसाचाराच्या अतिशय धोकादायक परिस्थितीत प्रवेश करेल. कोणत्याही राजकीय संघर्षाला उत्तर देण्यासाठी हिंसाचाराचा वापर करता येत नाही कारण हिंसाचारामुळे फक्त अधिक हिंसाचार होऊ शकतो, असे सुबियांतो यांनी नमूद केले. इंडोनेशिया हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. या ध्येयाच्या दिशेने आपण काम करूया, असे त्यांनी नमूद करत ओम शांती शांती शांती ओम या मंत्राने आपले भाषण संपवले.
