एक जुनी म्हण आहे “जस अन्न, तस मन आणि तशीच आरोग्यस्थिती.” म्हणजे आपण जे खातो, त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. प्राचीन सिद्ध चिकित्सा पद्धतीत सुद्धा आहाराकडे याच दृष्टीने पाहिले जाते. या पद्धतीनुसार अन्न तीन प्रकारचे असते आणि ते आपल्या तीन गुणांवर परिणाम करते सत्त्व (शुद्ध व उत्तम), रजस (सक्रिय व उत्तेजक) आणि तमस (निष्क्रिय व जड). केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय सांगते की योग्य आहार निवडून आपण मन शांत ठेवू शकतो, शरीर निरोगी ठेवू शकतो आणि जीवन संतुलित बनवू शकतो. सिद्ध चिकित्सेनुसार अन्न केवळ पोट भरण्याचे साधन नाही, तर ते आरोग्य आणि मनाचे औषध आहे.
सिद्ध चिकित्सा ही दक्षिण भारतातील पारंपरिक वैद्यकीय पद्धत आहे, जी शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनावर भर देते. यात अन्न तीन वर्गांमध्ये विभागले जाते — जे मनुष्याच्या सत्त्व, रजस आणि तमस या गुणांवर परिणाम करतात. १) सत्त्व (सत्त्वम्) उत्तम गुण वाढवणारा आहार. हा सात्त्विक आहारासारखाच असतो शुद्ध, ताजा आणि नैसर्गिक. यामध्ये ताजी फळे, भाज्या, धान्य, दूध आणि सौम्य मसाले येतात. हा आहार मन शांत ठेवतो, शरीराला पोषण देतो आणि एकाग्रता वाढवतो. सिद्ध चिकित्सेत याला आरोग्य आणि आध्यात्मिक विकासासाठी सर्वोत्तम मानले जाते. नियमित सेवनाने सकारात्मकता, शुद्धता आणि संतुलन वाढते.
हेही वाचा..
२०२५ मधील पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक दौऱ्यांची झलक
संदेशखलीमध्ये तृणमूलच्या नेत्याला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
अवकाशात मोठी झेप घेण्याच्या तयारीत भारत
बनावट आयएएस अधिकारी बनून फसवणूक
२) रजस (इरक्तम्) — सक्रियता वाढवणारा आहार हा राजसिक प्रकारचा आहार आहे. मसालेदार, तिखट, खारट आणि उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. उदा. कांदा, लसूण, मिरची, चहा-कॉफी, तळलेले पदार्थ. हा आहार ऊर्जा देतो आणि क्रियाशीलता वाढवतो, पण अती सेवनामुळे चिडचिड, अस्वस्थता आणि आक्रमकता वाढू शकते. म्हणून तो मर्यादित प्रमाणात घेण्याची शिफारस केली जाते.
३) तमस (तमकम्) — निष्क्रियता वाढवणारा आहार हा तामसिक प्रकारचा आहार आहे. जड, बासी, प्रक्रिया केलेले किंवा मांसाहारी पदार्थ. उदा. उरलेले अन्न, दारू, अतितळलेले किंवा फार जड पदार्थ. हा आहार आळस, सुस्ती आणि मानसिक गोंधळ निर्माण करतो. सिद्ध चिकित्सेत याला आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते आणि शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञांचा सल्ला आहे की आपल्या प्रकृतीनुसार आहार निवडावा आणि सत्त्वप्रधान आहाराला प्राधान्य द्यावे. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर आरोग्य आणि मनासाठी औषध आहे. सत्त्वप्रधान आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते. आजच्या तणावपूर्ण जीवनात ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे.
