अमेरिका होर्मुज मार्गावरील जहाजांना अडवणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

अमेरिका होर्मुज मार्गावरील जहाजांना अडवणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबादमधील चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष न निघाल्यानंतर ट्रुथ सोशलवर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी होर्मुज सामुद्रधुनी आणि अण्वस्त्रे (न्यूक्लियर) विषयावर मतभेद कायम असल्याचे मान्य करत  आता होर्मुजमधून जाणाऱ्या सर्व जहाजांना अडवण्याची तयारी दर्शवली आहे.

दोन वेगवेगळ्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की अनेक मुद्द्यांवर सहमती झाली, पण होर्मुझ सामुद्रधुनी आणि अणु विषयावर चर्चा निष्फळ ठरली. त्यांनी लिहिले की, “तत्काळ प्रभावाने, अमेरिकन नौदल होर्मुज सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजाला अडवण्याची प्रक्रिया सुरू करेल.”

ट्रम्प यांनी यापूर्वीच्या पोस्टमध्ये पाण सुरुंग लावल्याच्या शक्यतेचा उल्लेख केला होता. त्यांनी पुन्हा असा दावा केला की इराणने जहाजांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी ‘कुठे तरी पाणसुरुंग लावलेले असू शकतात’ असे सांगत आहे.

हे ही वाचा:

बांग्लादेश घेणार भारतातून रिफाइन होणार रशियन क्रूड ऑईल

टीसीएसची फ्रेशर्स भरतीत कपात, २५,००० ऑफर्सवरच ब्रेक

दक्षिण लेबेनॉनमधील घरे इस्रायलने केली उद्ध्वस्त

कॉर्पोरेट धर्मांतरणाविषयी नाशिकमधील टीसीएस कंपनीने दिले स्पष्टीकरण

त्यांच्या मते, ही संपूर्ण जगाकडून “जबरदस्तीने वसूली” करण्याची पद्धत आहे आणि अमेरिका अशा दबावाला कधीही झुकणार नाही. त्यांनी नौदलाला निर्देश दिले आहेत की आंतरराष्ट्रीय पाण्यात अशा सर्व जहाजांना शोधून थांबवावे, ज्यांनी इराणला कोणत्याही प्रकारचा ‘टोल’ दिला आहे.

ट्रम्प यांनी इशारा दिला की अशा प्रकारे टोल देणाऱ्या जहाजांना समुद्रात सुरक्षित मार्ग मिळणार नाही. तसेच, होर्मुजमध्ये लावलेल्या कथित माइनस् नष्ट करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “कोणताही इराणी—जो आमच्यावर किंवा शांततापूर्ण जहाजांवर गोळीबार करेल—त्याला पूर्णपणे नष्ट केले जाईल.”

याशिवाय, त्यांनी असा दावा केला की इराणची नौदल क्षमता, त्यांचे नेतृत्व, सेना आणि एअर डिफेन्स सिस्टीम मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे.

ट्रम्प यांच्या मते, हा ‘ब्लॉकेड’ (नाकेबंदी) लवकरच सुरू होणार असून यात इतर देशही सहभागी होऊ शकतात. त्यांनी सांगितले की इराणला “अवैध वसूली” करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि अमेरिका पूर्णपणे सज्ज आहे.

Exit mobile version