हरलात की निवडणूक यंत्रणा सदोष, पण जिंकले तर मात्र शपथ घेता!

हरलात की निवडणूक यंत्रणा सदोष, पण जिंकले तर मात्र शपथ घेता!

लोकसभेत निवडणूक सुधारणा विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची गृहमंत्री अमित शहा यांनी खरपूस समाचार घेतला. निवडणुका हरलात की वोटचोरी, निवडणूक यंत्रणेवर आरोप पण जिंकले की शपथ घ्यायला मोकळे, अशा शब्दात शहा यांनी विरोधकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले.

सभागृहात काँग्रेसला संबोधित करत शाह म्हणाले की, काँग्रेसचा पराभव निवडणूक आयोगामुळे नाही, तर त्यांच्या नेतृत्वामुळे होत आहे. अमित शहा यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टोमणा मारला.

‘आरएसएसने विविध संस्थावर कब्जा घेतल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला. ’ या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार पलटवार केला. शाह यांनी सांगितले की देशासाठी प्राणत्याग करणे, देशाला सर्वोच्च समृद्धीपर्यंत नेणे आणि देशाच्या परंपरांचे पालन करणे हीच आरएसएसची विचारसरणी आहे आणि अशा लोकांना महत्त्वाच्या पदांवर असण्यात काहीही चुकीचे नाही.

अमित शाह म्हणाले, “राहुल गांधी म्हणाले की सर्व घटनात्मक संस्थांत भ्रष्टाचार झाले आहेत. आरएसएस विचारसरणी असलेल्या लोकांना महत्त्वाच्या पदांवर बसवले जात आहे. यात काय आक्षेप? देशात असा कोणता कायदा आहे का, ज्यात आरएसएसची विचारसरणी असलेले लोक महत्त्वाच्या पदांवर बसू नयेत?”

ते पुढे म्हणाले, “या देशाचे पंतप्रधान आरएसएसची विचारसरणी मानतात, गृहमंत्री मानतात, आणि ते लोकांच्या कौलावर सत्तेत आले आहेत

यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांच्या भाषणादरम्यान सदनातून वॉकआउट केले. शाह यांनी त्यांना ‘बेकायदेशीर घुसखोरांना’ मतदारयादीत ठेवण्यासाठी आग्रही असल्याबद्दल आरोप केला.

राहुल गांधींच्या आरोपांवर शाहांची प्रतिक्रिया

शाह म्हणाले की २०१४ पासून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ते २०२५ पर्यंत, विरोधकांनी नेहमीच निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतली आहे. या काळात भाजपने लोकसभा आणि राज्य निवडणुकांसह ४४ निवडणुका जिंकल्या, परंतु विरोधकांनाही अनेक जागा मिळाल्या.

हरियाणाच्या मतदारयादीतील तफावत दाखवणाऱ्या राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ पत्रकार परिषदेकडे निर्देश करत शाह म्हणाले, “काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला की ते निवडणूक यंत्रणेलाच दोष देतात. पण जिंकले तर? तेव्हाच तर तुम्ही लगेच शपथ घेता! जर मतदारयादी भ्रष्ट असेल, तर शपथ का घेतली?”

हे ही वाचा:

पोटदुखीपासून खोकल्यापर्यंत ‘अजवाइन’ वरदान

तृणमूल नेत्याविरुद्धच्या प्रमुख साक्षीदाराच्या गाडीचा अपघात; संशय व्यक्त

लंका दहनाचे श्रेय राहुल गांधीचेच

तृणमूल नेत्याविरुद्धच्या प्रमुख साक्षीदाराच्या गाडीचा अपघात; संशय व्यक्त

सभागृहात काँग्रेसला संबोधित करत शाह म्हणाले की काँग्रेसचा पराभव निवडणूक आयोगामुळे नाही, तर त्यांच्या नेतृत्वामुळे होत आहे

शाह पुढे म्हणाले, “आम्हीही कधीकाळी विरोधात होतो. आम्ही जिंकल्या पेक्षा जास्त निवडणुका हरलो. आमच्या आयुष्याचा चतुर्थांश काळ विरोधात गेला. पण आम्ही कधीही निवडणूक आयोगावर किंवा मुख्य निवडणूक आयुक्तावर आरोप केले नाहीत.”

राहुल गांधी आणि अमित शाह यांनी परस्परांवर जनतेला व संसदेला दिशाभूल केल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले, “अमित शाहजी, मी तुम्हाला तीन पत्रकार परिषदांवर खुल्या चर्चेची आव्हान देतो. शाह यांनी हे आव्हान दुर्लक्ष करून प्रतिआक्रमण सुरू ठेवले.

काँग्रेसची वोट चोरी’ — शाहांचे प्रत्यारोप

अमित शाह यांनी काही ऐतिहासिक उदाहरणे देत काँग्रेसवर “वोट चोरी” केल्याचे आरोप केले.

ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या पंतप्रधान निवडीमध्ये प्रांतिक काँग्रेस समित्यांच्या मतदानात सरदार पटेल यांना 28 मते मिळाली, आणि जवाहरलाल नेहरू यांना फक्त 2. तरीही नेहरू पंतप्रधान झाले — हेच खरे ‘मतांची चोरी’.

त्यांनी सोनिया गांधी यांचे उदाहरण देत सांगितले की भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्या मतदार झाल्या, आणि ही बाब आता न्यायालयात आहे.

शाह पुढे म्हणाले की काँग्रेसची धोरणे घुसखोरीला सामान्य करण्याची आहेत — घुसखोरांना मान्यता, ओळखपत्रे आणि नंतर मतदारयादीत नावे देणे. त्यामुळेच विरोधक SIR प्रक्रियेचा विरोध करतात असे ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले, “एनडीए चे धोरण ‘Detect (शोधा), Delete (हटवा), Deport (त्यांच्या देशात पाठवून द्या) आहे आणि आम्ही ते पूर्ण करू.”

विरोधकांनी वॉकआउट करताच शाह म्हणाले,
“हे का पळून गेले? मी काँग्रेसबद्दल बोलत नव्हतो, मी तर घुसखोरांबद्दल बोलत होतो.”

Exit mobile version