चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील नगरपालिकेच्या शेजारील रस्त्यालगतच्या ७० वर्षे जुने वृक्ष तोडल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. सदस्य देवराम भोंगळे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ बोलत होते.
मंत्री मिसाळ यांनी सांगितले की, केवळ तोंडी सूचनेवर, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तब्बल ७० वर्षे जुन्या वृक्षाची छाटणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. फांद्या छाटण्याच्या नावाखाली जवळपास संपूर्ण वृक्ष तोडण्यात आले असून या प्रकरणी सुरुवातीला कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र सदस्यांनी तक्रार केल्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा..
खासदार पंकज चौधरी यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन
जागतिक अनिश्चिततेनंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
झोपू प्राधिकरणाच्या पुनर्वसित इमारतीच्या कॉर्पस फंडात वाढ करणार
एसबीआयची कर्ज एफडीच्या व्याजदरात कपात
या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराला ७० वर्षांच्या वृक्षाएवढ्या संख्येने नव्या वृक्षांची लागवड करून त्यांचे सात वर्षे संगोपन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
