डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला. निवडणुकीत १०१ पैकी ५० जागा भाजपने जिंकल्या. यानंतर केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी भाजपचे व्ही. व्ही. राजेश यांनी शपथ घेतली. राजेश यांनी घेतलेली शपथ ही दक्षिणेकडील राज्याच्या राजकीय दृश्यातील एक महत्त्वाचा क्षण होता.
पदभार स्वीकारल्यानंतर राजेश यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे की, “सर्वांना सोबत घेऊन आम्ही एकत्र पुढे जाऊ. सर्व १०१ वॉर्डमध्ये विकास राबवला जाईल. तिरुअनंतपुरम एक विकसित शहरात रूपांतरित होईल.” राजेश यांचे महापौरपद केरळच्या शहरी राजकारणात भाजपसाठी एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. २००९ पासून काँग्रेसचे शशी थरूर यांच्या ताब्यात हा मतदारसंघ असून शहराच्या महानगरपालिकेवर ४५ वर्ष माकपचा ताबा होता.
हे ही वाचा..
‘ऑपरेशन सिंदूर २.०’ ची पाकिस्तानला धास्ती! नियंत्रण रेषेवर काउंटर ड्रोन यंत्रणा तैनात
‘धुरंधर’चा १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
आझमगडमधील लंडनस्थित मौलवीला भारतातून मिळत होता पगार; प्रकरण काय?
निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीजवळ पुन्हा परवानगीशिवाय ड्रोन चित्रीकरण; गुन्हा दाखल
समारंभानंतर केरळ भाजपचे प्रमुख राजीव चंद्रशेखर म्हणाले, “दुर्दैवाने, महानगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. यापूर्वी महानगरपालिकेने पैसे वाया घालवले आहेत आणि तिरुअनंतपुरमचा विकास करण्यासाठी काहीही केले नाही. गेल्या ४५ वर्षांपासून ड्रेनेज, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत समस्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच, ज्या दिवशी लोक आम्हाला त्यांची सेवा करण्याची परवानगी देतील त्या दिवसापासून आम्ही तिरुवनंतपुरमच्या विकासावर काम सुरू करू असे म्हटले आहे. आमचे महापौर राजेश यांनी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला तिरुवनंतपुरमला देशातील पहिल्या तीन शहरांपैकी एक बनवायचे आहे. ते आमचे ध्येय आहे. आणि त्यासाठी आमचे काम आजपासून सुरू होते.”
