भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक मराठी फेरीवाले, कोळी समाज आणि पारंपरिक व्यवसायांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला.
त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, कोणी म्हणतं हा महापौरांचा विषय आहे का? होय… महापौर फक्त वॉटर-मीटर-गटर पाहणार नाहीत; मुंबईचा पाया असलेल्या कोळी, आगरी, भंडारी समाजाच्या उपजीविकेचं संरक्षण करणं हीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे आणि त्या ती निभावत आहेत म्हणून मुंबईच्या महापौरांचे यासाठी अभिनंदन!
दादरसारख्या मराठी-हिंदू बहुल भागात २०२० नंतर अचानक मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढली. स्थानिक मराठी फेरीवाल्यांना, विशेषतः पालघर, वसई, सफाळा येथून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना… बसू दिलं जात नाही, हप्ते वसुली केली जाते, संरक्षण दिलं जात नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
न्यूज डंकाने दादरमधील फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता. बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांनी जो उच्छाद दादरमध्ये घातला आहे, त्या विषयावर न्यूज डंकाने सातत्याने बातम्या केल्या, त्याचे वास्तव मांडले. त्यातून आता दादरमध्ये कारवाईही झाली.
हे ही वाचा:
मध्यपूर्वेतील रणसंग्रामानंतर इराणचे हवाई क्षेत्र काही मिनिटांत रिकामे
सोन्यात स्थिरता, चांदी २,८४,९०० रुपयांवर
वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापूर्वी गौतम गंभीर कालीघाट मंदिरात
वॉर्नर ब्रदर्स–पॅरामाउंटचा ऐतिहासिक करार
चित्रा वाघ म्हणाल्या की, दादरमधील “झिरो नंबर” प्रकरणात जमालुद्दीन आणि त्याचा भाऊ शमशुद्दीन रोहिंग्यांसाठी निधी उभारत असल्याचं उघडकीस आलं तेव्हा भाजप माहीमच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर आणि साखरकर यांनी जाब विचारला आणि आज त्यांनाच केसेसला सामोरं जावं लागतंय, दर महिन्याला कुर्ला कोर्टात हजेरी लावावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. जनता मार्केट, जे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी माणसांसाठी हॉकर्स झोन म्हणून उभारलं होतं, तिथे आज ९०% गैरमराठी आणि गैरहिंदू व्यापारी असल्याची तक्रार आहे.
तपास केल्यावर लक्षात आलं की त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत आणि बहुतांश फेरीवाल्यांच्या आधार कार्डवर जन्मतारीख १ जानेवारी … ही शंका उपस्थित करणारी बाब आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद येथून कागदपत्र तयार होतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. वाढत्या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांमुळे पारंपरिक कोळी महिलांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. अनैसर्गिक स्पर्धा निर्माण करून पारंपरिक बाजार व्यवस्था विस्कळीत केली जात आहे.
चित्रा वाघ यांनी सांगितले की, याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे बदलती डेमोग्राफी. लव्ह जिहाद, लँड जिहाद वाढते प्रकार बांगलादेशी घुसखोरी ही हे सगळं स्थानिक नेते, बीएमसीची लोकं यांसारख्या लोकांना हाताशी धरून झालं आहे. गेल्या ५० वर्षांत साचलेली ही घाण आहे आणि ती साफ करण्याचं काम महायुती सरकार करत आहे, त्याचं कौतुक झालंच पाहिजे.
या पार्श्वभूमीवर कठोर आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. मुंबईचा इतिहास, संस्कृती आणि उपजीविका वाचवण्यासाठी ठोस कारवाई झालीच पाहिजे. मुंबई स्थानिकांची आहे आणि राहील, असेही चित्रा वाघ यांनी ठासून सांगितले.
