मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, मतदानानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आल्याने मुंबईतील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या एक्झिट पोल्समुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ताबदल होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होणार असून, त्याआधीच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमधून संभाव्य निकालाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
नवी मुंबईतील मतदान केंद्रावर कोब्रा सापाची एंट्री
श्रीकांत दुसऱ्या फेरीतच बाद; इंडिया ओपनमध्ये भारतीयांना धक्का
जळगाव शहरात मतदानादरम्यान गोळीबार
जनमतच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अंदाजानुसार भाजप-शिंदे सेनेला सुमारे १३८ जागा मिळू शकतात. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गटाला मिळून सुमारे ६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला सुमारे २० जागा, तर इतर पक्षांना ७ जागा मिळू शकतात, असेही या पोलमध्ये सांगण्यात आले आहे.
JVC मुंबई एक्झिट पोल
भाजप शिंदे – 138
ठाकरे- मनसे – 59
काँग्रेस-वंचित – 23
इतर – 7
Axis My India मुंबई एक्झिट पोल
भाजप शिंदे – 131- 151
ठाकरे- मनसे – 58-68
काँग्रेस-वंचित – 12-16
इतर – 6-12
JDS मुंबई एक्झिट पोल
भाजप शिंदे – 127-154
ठाकरे- मनसे – 44-64
काँग्रेस-वंचित – 16-25
इतर – 09-17
दरम्यान, टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला (भाजप-शिंदे गट) सुमारे ४२ ते ४५ टक्के मते मिळण्याचा कल दिसतो आहे. ठाकरे-मनसे गटाला ३४ ते ३७ टक्के, तर काँग्रेस-वंचित गटाला १३ ते १५ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून असे संकेत मिळत आहेत की गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, आणि भाजप-शिंदे युती सत्तेच्या जवळ पोहोचू शकते. मात्र, हे सर्व अंदाज एक्झिट पोलवर आधारित असून खरा निर्णय मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. त्यामुळे बीएमसीवरील सत्ता प्रत्येक राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच कारणामुळे या एक्झिट पोल्समुळे पुढील काही दिवस मुंबईचे राजकारण अधिक तापलेले पाहायला मिळणार आहे.
