राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो समोर येताच चर्चांना उधाण आले होते. एका कार्यक्रमात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे समोर आले आहे. तसेच काही मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. राऊत यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती देत काही काळ विश्रांती घेणार असल्याचे म्हटले होते. डॉक्टरांनीही त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते.
संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी संजय राऊतही कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राऊत यांनी एकमेकांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता, संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जवळपास १५ मिनिटे चर्चा सुरू होती. यावेळी आशिष शेलार हे देखील बाजूला बसले होते.
हे ही वाचा..
रोहिंग्यांबद्दलच्या टिप्पणीवर तृणमूल खासदार म्हणतात, “न्यायाधीश जास्त बोलतात”
हुमायू म्हणतो, मशीद बांधू द्या, नाहीतर महामार्ग ताब्यात घेऊ!
“बाबरी मशीद बांधण्यासाठी नेहरूंनी सार्वजनिक निधी मागितला होता”
पुतिन यांच्या भेटीपूर्वी भारत- रशियामध्ये ‘या’ लष्करी कराराला मिळाली मान्यता
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत हे सोशल मीडियावरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहेत.
