काँग्रेसमध्ये ‘ताटा’वरून तट

पवन खेरा यांची शशी थरूर यांच्यावर टीका

काँग्रेसमध्ये ‘ताटा’वरून तट

काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खासदार शशी थरूर यांच्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली असून त्यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते संभ्रमात पडले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी खास भोजनाचे आयोजन करण्यात आलेले असताना शशी थरूर यांनाही आमंत्रणं देण्यात आले होते. यावेळी जेवणाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारण्याच्या थरूर यांच्या निर्णयावर पक्षातून टीका होत आहे. टीका होण्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शशी थरूर यांच्यावर टीका करत या खेळल्या जाणाऱ्या “खेळाबद्दल” कल्पना नाही का असा सवाल विचारला आहे. “जेव्हा पक्षातील नेत्यांना आमंत्रित केले जात नाही, पण आपल्याला आमंत्रित केले जाते, तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की हा “खेळ” खेळला जात आहे. कोण खेळत आहे आणि आपण त्याचा भाग का नसावे,” अशी टीका खेरा यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, त्यांना आश्चर्यकारक वाटले की काँग्रेस सदस्याला निमंत्रण पाठवण्यात आले आणि ते स्वीकारण्यात देखील आले.

दरम्यान, शशी थरूर म्हणाले की ते नक्कीच या डिनरला उपस्थित राहतील, तसेच विरोधी नेत्यांना आमंत्रित न करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. “मला माहित नाही की कोणत्या आधारावर आमंत्रण पाठवले जात आहे, पण मी नक्कीच जाईन; विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले गेले नाही हे योग्य नाही,” असे त्यांनी रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहण्यापूर्वी सांगितले.

हे ही वाचा:

‘इंडिगो’ची १,००० हून अधिक उड्डाणे रद्द! सीईओ काय म्हणाले?

अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीवर सेबीकडून ५४६ कोटी रुपयांची जप्ती

एका महिन्यात ४५ हजार ९११ सौर पंप बसवून महाराष्ट्र गिनीज बुकात

शेफाली वर्माची दणदणीत कामगिरी

यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना राष्ट्रपती भवनात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी आयोजित केलेल्या जेवणाचे आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. तसेच राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी नेत्यांना भेट देणाऱ्या शिष्टमंडळांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्याची परंपरा मोडल्याचा आरोप केला. यानंतर राहुल गांधींचा आरोप निराधार असल्याचे सांगत तो फेटाळून लावण्यात आला. त्यांनी निदर्शनास आणून देण्यात आले की, ९ जून २०२४ रोजी राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यापासून बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह किमान चार राष्ट्रप्रमुखांना भेटले.

Exit mobile version