उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज

व्हीडिओत आमदार दिसला, पण अध्यक्षांनी इशारा दिला

उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज

उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी विचित्र घटना घडली. विधानसभेच्या प्रवेशद्वारात कुणीतरी थुंकल्याचे लक्षात आले. कुणीतरी आमदाराने पानसुपारी खाऊन तिथे थुंकल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्ष सतीश महाना यांनी ते स्वच्छ करण्यास सांगितले आणि नंतर त्यासंदर्भात समज दिली.

उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी मंगळवारी विधानसभेच्या कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर एका सदस्याने पान मसाला थुंकल्याच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महानांनी तत्काळ स्वच्छतेची व्यवस्था सुनिश्चित केली आणि या अनुशासनहीन कृतीची कडक शब्दांत टीका केली. संबंधित आमदाराचा व्हीडिओ उपलब्ध होता पण त्याचे नाव अध्यक्षांनी जाहीर केले नाही.

हे ही वाचा:

भोपाळमध्ये महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणार

मोबाईल चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू

दिलीप जायस्वाल यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक

सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण

सभागृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की, विधानसभेची प्रतिष्ठा राखणं ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की, घटनेचा व्हिडिओ उपलब्ध आहे, पण कोणालाही सार्वजनिकपणे अपमानित करणं त्यांचा उद्देश नाही.

महानांनी सर्व सदस्यांना आवाहन केलं की, भविष्यात अशी घटना दिसल्यास ती तत्काळ थांबवावी आणि स्वच्छता राखण्यात सहकार्य करावं. अध्यक्ष सतीश महाना म्हणाले की, ज्याने हे कृत्य केलं आहे, त्याने स्वतःहून पुढे येऊन ते स्वीकारावं, अन्यथा त्यांना बोलावं लागेल. त्यांनी स्पष्ट केलं की, विधानसभा ही केवळ अध्यक्षांची नाही, तर सर्व ४०३ सदस्य आणि उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेची आहे, ज्यांची स्वच्छता आणि सन्मान राखणं सर्वांची जबाबदारी आहे.

Exit mobile version