मोबाईल चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी साकिनाका येथे घडली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी पितापुत्राच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघाना अटक करण्यात आली आहे.
अशोक तुळसे (३०) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या संशयिताचे नाव आहे. साकीनाका येथील अशोक नगर या ठिकाणी राहण्यास होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकने सुरेश डुंगव या व्यक्तीचा मोबाईल फोन चोरल्याचा संशयावरून आरोपी सुरेश (५४) आणि त्याचा मुलगा लक्ष्मण (३२) यांनी साकीनाका येथील काजूपाडा येथे अशोकला गाठून त्याला मारहाण केली या मारहाणीत अशोकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला, त्यानंतर ते दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.
हे ही वाचा :
दिल्लीत बांबू प्लांटेशनला प्रारंभ
इस्त्रायलकडून सीरियन बटालियनवर हवाई हल्ले
बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले
बैठकीत झालेल्या बाचाबाचीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनची लष्करी मदत थांबवली
स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अशोकला घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत अशोक हा डंपर चालक होता.आरोपी सुरेश हा रंगकाम करणारा आहे, तर त्याचा मुलगा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. मृत अशोकच्या भावाच्या तक्रारीवरून साकिनाका पोलिसांनी सुरेश आणि लक्ष्मण डुंगव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३(१) (खून) आणि ३(५) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघाना अटक करण्यात आली आहे.